5000 फूटावरून पडल्यानंतरही वाचले महिलेचे प्राण


कॅनडा येथे पॅराशूट न उघडल्यामुळे पडलेल्या महिलेचे आश्चर्यकारकरित्या प्राण वाचले आहेत. 30 वर्षीय महिलेचे नाव अद्याप समोर आलेले नाही. स्काय डायविंग करत असताना 4,900 फूट उंचावरून खाली येत असताना तिचा पॅराशूट उघडला गेला नाही, त्यामुळे ती झाडांवर पडली.

10 ऑगस्ट रोजी ही घटना क्युबेक येथील स्काय डायविंग सेंटर येथे घडली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, एवढ्या उंचावरून पडल्यानंतर देखील महिला वाचणे हे आश्चर्यकारक आहे.

महिलेला याआधी देखील स्काय डायविंग करण्याचा अनुभव आहे.  महिलेला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर आले असून, तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, तिला खाली येताना पाहत होतो, असे वाटत होते की, काहीतरी होईल. आम्ही खूप काळजीत होतो. तसेच, पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत.

 

Leave a Comment