पार्ले जीवर दिसणाऱ्या आहेत या उच्चपदस्थ महिला


सोशल मीडियावर सध्या एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये दावा करण्यात आलेला आहे की,  याफोटोमध्ये दिसणारी महिला ही, पार्ले जीच्या कव्हरवर दिसणारी मुलगी आहे. दावा करण्यात आला आहे की,  त्यांचे वय नीरू देशपांडे असून, त्या 65 वर्षांच्या झाल्या आहेत. या व्हायरल फोटोची तपासणी केल्यानंतर हा फोटो फेक असल्याचे समोर आले आहे.

हा फोटो The Pagla Engineer नावाच्या फेसबूक पेजवरून 700 पेक्षा अधिक जणांनी शेअर केला आहे.

गुगलवर रिवर्स सर्च केल्यानंतर या फोटो मागचे सत्य समोर आले आहे. फोटोमध्ये दिसणाऱ्या या महिला इंफोसिस फाउंडेशनच्या चेअरपर्सन सुधा मुर्ती आहेत. मेहता पब्लिशिंग हाउसद्वारे लिहिण्यात आलेल्या एका ब्लॉगमध्ये हा फोटो वापरण्यात आला होता. तेथून हा फोटो सर्वत्र व्हायरल झाला.

सुधा मुर्ती यांचा हा फोटो जानेवारी 2013 आहे. त्यावेळी त्यांनी मेहता पब्लिशिंग हाउसला भेट दिली होती. इंफोसिसच्या वेबसाइटवर देखील सुधा मुर्ती यांचा फोटो दिसून येतो.

पार्ले जी वर दिसणारी मुलगी कोण ?
पार्ले जी वर दिसणारी मुलगी ही एक इलेस्ट्रेशन म्हणजे प्रतिकात्मक आहे. पार्ले प्रोडक्ट्स ग्रुपचे मॅनेजर मयंक शाह यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती. 60 च्या दशकात एव्हरेस्ट क्रिएटिवद्वारा हा फोटो बनवण्यात आला होता.

Leave a Comment