व्हॅसलीन घरामध्ये असायलच हवे


व्हॅसलीन किंवा पेट्रोलियम जेली म्हटले की मनात विचार येतो ते कोरड्या पडत असलेलेया त्वचेचा, आणि फाटलेल्या ओठांचा. या दोन्ही त्रासांसाठी व्हॅसलिन अतिशय गुणकारी आहे. पण याशिवाय देखील व्हॅसलीनचे अनेक फायदे आहेत.

रेझरची धार टिकून राहावी म्हणून रेझर वापरल्यानंतर स्वच्छ धुऊन कोरडा करून घ्यावा. त्यानंतर रेझरवर व्हॅसलीन चा पातळ थर लावावा. रेझरला व्हॅसलीन लावून ठेवल्याने रेझरची धार खूप दिवसांपर्यंत चांगली टिकून राहते. मात्र रेझर नीट सुकवून घ्यावा नाहीतर त्याच्या बेल्डला गंज लागण्याचा संभव असतो.

मेकअप चेहऱ्यावरून हटविण्यासाठी व्हॅसलीन अतिशय उपयुक्त आहे. कधी कधी चेहरा पाण्याने धुऊन देखील मेकअप चेहऱ्यावरून नीट निघत नाही. अशा वेळी कापसाच्या बोळ्यावर व्हॅसलीन घेऊन त्याने चेहरा पुसून काढल्यास मेकअप चेहऱ्यावरून हटविता येतो. प्रसाधनाचा भाग म्हणून अनेक तरुणी आर्टिफिशियल पापण्यांचा वापर करतात.( false eyelashes ). या पापण्या डोळ्यांना चिकटविण्यासाठी एका विशिष्ट प्रकाच्या ग्लू (डिंक) चा वापर करावा लागतो. हे ग्लू पाण्याने धुऊन निघत नाही, अश्या वेळी ते डोळ्यांवरून हटविण्याकरिता व्हॅसलीन चा वापर करावा. तसेच व्हॅसलीन मध्ये आपला आवडता रंग वापरून लिप बाम ही बनविता येऊ शकते. या कामी खाण्याचा रंग वापरावा.

कधी कधी पिशवीची, पर्सची, ड्रेसची किंवा पँट ची झिप अडकून जाते आणि ती उघडण्यास किंवा बंद करण्यास त्रास होतो. अश्या वेळी झिपला थोडेसे व्हॅसलीन लावावे आणि झिप उघड-बंद करावी. असे केल्याने झिप ला चांगले वंगण मिळते आणि झिप नीट उघडता – बंद करता येऊ लागते. तसेच कधीकधी नेल पॉलीशच्या बाटलीचे झाकण अगदी घट्ट बसून जाते आणि काही केल्या उघडत नाही. असे होऊ नये म्हणून नेल पॉलिश लावून झाल्यानंतर बाटलीचे झाकण जिथे लावायचे त्या भागाला व्हॅसलीन लावावे. यामुळे पुढे कधीही नेल पॉलिश वापरायचे झाले तर त्याच्या बाटलीचे झाकण अगदी सहज उघडता येईल.

पुष्कळ वेळा आपण सीडी किंवा डीवीडी लावली की त्यावरील ओरखड्यांमुळे ती सीडी किंवा डीवीडी नीट चालू शकत नाही. असे ओरखडे सीडी किंवा डीवीडी वर उठू नयेत म्हणून त्यावर व्हॅसलीन लावून ठेवावे.

ओठांसाठी स्क्रब तयार करायचा झाल्यास व्हॅसलीन मध्ये थोडीशी साखर मिसळून स्क्रब म्हणून वापरावे.

घरामध्ये किंवा ऑफिस मध्ये रंगकाम चालू असताना दरवाजे किंव्या खिडक्यांना देखील रंग दिला जातो. काही वेळेला हा रंग दरवाज्याच्या किंवा खिडक्यांच्या कड्यांना किंवा हँडल्स ला देखील लागतो. एकदा का हा रंग वाळला की मग तो निघता निघता नाही. असे होऊ नये म्हणून दरवाज्यांच्या किंवा खिडक्यांच्या कड्यांना आणि हँडल्स ना रंग देण्याच्या आधी व्हॅसलीन लावावे. त्यामुळे रंग कड्यांवर लागलाच तरी तो तिथे चिकटून राहणार नाही. तसेच लेदर चे बूट, बॅग्स किंवा अगदी सोफाही पॉलिश करायचा असल्यास व्हॅसलीनचा वापर करावा. व्हॅसलीनमुळे लेदर नरम होऊन त्यावर चांगली चकाकी येते. व्हॅसलीन लेदर वर वापरल्यामुळे त्यावर जरी थोडेफार पाणी सांडले तरी लेदर खराब होण्याचा धोका नसतो. मात्र पाणी सांडल्यास ते तसेच राहू न देता लवकरात लवकर पुसून घ्यावे.

Leave a Comment