45 कोटीत जेम्स बॉण्डच्या एस्टन मार्टिन डीबी 5 कारची विक्री


जेम्स बॉण्डची 1965 मध्ये बनवण्यात आलेल्या एस्टन मार्टिन डीबी5 कारचा लिलाव करण्यात आला. कॅलिफोर्निया येथे झालेल्या या लिलावात कारवर 6.4 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 45 कोटी रूपयांची बोली लावण्यात आली.

एस्टन मार्टिन डीबी5 हे मॉडेल 1965 मध्ये आलेल्या जेम्स बॉण्डच्या थंडरबॉल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आले होते. मात्र चित्रपटात ही कार कधीच वापरण्यात आली नाही.

या कारमध्ये असे अनेक फिचर्स आहेत. यामध्ये फुल बाँड मोडिफिकेशन्समध्ये एक खोटी बंदूक, व्हील-हब माउंटेड टायर स्लँशर्स, बुलेट फ्रुफ स्क्रीन यासारख्या गोष्टी पाहायला मिळतात.

आतापर्यंतच्या जेम्स बॉण्डच्या कारसाठी मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे.

2010 मध्ये देखील या कारचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी लिलावात केवळ 4.6 मिलियन डॉलरमध्ये कारचा लिलाव झाला होता. जेम्स बॉण्डने आपल्या चित्रपटात 35 वर्ष या कारचा वापर केला. 1969 मध्ये या कारचा पहिल्यांदा लिलाव करण्यात आला होता.

Leave a Comment