तुम्हाला कोठे तरी जायला खूप उशीर झाला आहे आणि अशावेळेस तुम्हाला एकही गाडी अथवा कँब भेटत नाही, असे कधी झाले आहे का तुमच्याबरोबर ? अशाच प्रकारे मध्यरात्री गाडी न मिळाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या हैद्राबादच्या एका व्यक्तीने हटके डोके लावत प्रवास केला आहे. मध्यरात्री कोणतीही गाडी न मिळाल्यामुळे त्याने चक्क झोमॅटोवर फूड ऑर्डर केली व फूड ऑर्डर केल्यानंतर त्या फूड डिल्हिवरी बॉयलाच लिफ्ट देण्यास सांगितले. त्या व्यक्तीने वापरलेल्या या भन्नाट आयडियेमुळे इंटरनेटवर अक्षरशः त्याचे फॅन झाले आहेत.
वेळप्रसंगी झोमॅटोवालाच झाला कॅब रायडर
मागिल आठवड्यात फेसबूक युजर ओबेश कोमिरीसेट्टीने आपल्या फेसबूक पोस्टवर हा अनुभव शेअर केला. त्याने लिहिले की, रात्रीच्या 11:50 मी इनओरबिट मॉल जवळ होतो आणि घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत होतो मात्र मला एकही रिक्षा भेटली नाही.
It was around 11.50 pm, I am at Inorbit Mall road and looking for an auto but couldn’t find anything to reach my room….
Posted by Obesh Komirisetty on Tuesday, August 6, 2019
ओबेशने एकही रिक्षा भेटत नसल्यामुळे जवळच्या फुड शॉप्सवर घरच्या पत्त्यावर जेवण ऑर्डर केले.
त्याने पुढे लिहिले की, डिल्हिवरी बॉय माझी ऑर्डर घेण्यासाठी जाणार होता. त्यावेळी त्याला कॉल करत ही माझीच ऑर्डर असून, मी त्याला डिल्हिवरी असलेल्या पत्त्यावर सोडण्यास सांगितले. अशा प्रकारे तो झोमॅटोच्या मध्यरात्री घरी पोहचू शकला.
Modern problems require modern solutions. ^PC pic.twitter.com/2bmo7EMIpu
— Zomato Care (@zomatocare) August 6, 2019
Award worthy 😂😂😂
— Ashutosh Date (@ashu_d08) August 14, 2019
This is GOLD! https://t.co/7YMNrp9iUC
— Ainkareswar (@kainkareswar) August 15, 2019
This shows we indians are truely jugaadus😂😂
— Deepak Agarwal (@Deepak2729) August 7, 2019
यासाठी त्याने झोमॅटोचे देखील आभार मानले. सोशल मीडियावर देखील त्याची ही पोस्ट व्हायरल झाली असून, अनेक लोक त्याच्या पोस्ट कमेंट्स करत आहेत.