गुगलच्या नाकावर टिचून हुवाई लाँच करणार स्वतःचे मॅप अ‍ॅप


चीनची स्मार्टफोन कंपनी आणि जगातील दुसरी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी ह्युएई स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम हार्मोनीओएस लाँच केल्यानंतर आता स्वतःचा मँप देखील तयार करणार आहे. ह्युएईच्या या मॅपचे नाव मॅप किट असे असेल. हे अॅप गुगल मॅप प्रमाणेच असेल. त्यामुळे गुगलच्या मॅपला टक्कर देण्यासाठी ह्युएई स्वतःचे मॅप अॅप लाँच करणार आहे.

ह्युएई मॅप किटवर जोरात काम करत असून, पुढील 150 दिवसात ही सर्विस सुरू करण्यात येऊ शकते. कंपनी या मॅपमध्ये लोकल मॅपिंग देखील देणार आहे. याचबरोबर यामध्ये जगभरातील 40 भाषांचा समावेश असेल. या मॅपमध्ये रिअल टाइम ट्रॅफिकची माहिती आणि ऑग्यूमेंट रियलिटी सपोर्ट देखील असेल.

ह्युएईने या मॅपच्या मदतीसाठी रशियाची गुगल म्हटली जाणारी कंपनी यांडेक्सबरोबर भागिदारी केली आहे.यांडेक्सबरोबरच कंपनीने बुकिंग.कॉमबरोबर देखील भागिदारी केली आहे. ह्युएईने काही दिवसांपुर्वीच गुगलच्या अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टमला टक्कर देण्यासाठी स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम लाँच केली. या ऑपरेटिंग सिस्टमला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्टवॉच आणि टिव्हीमध्ये वापरता येणार आहे.

मे मध्येच अमेरिकेने ह्युएईला एनटीटी लिस्टमध्ये टाकले असून, त्यामुळे ह्युएई कोणत्याही अमेरिकी कंपनीबरोबर भागिदारी करू शकत नाही. मात्र नंतर ह्युएईवरील प्रतिबंध हटवण्यात आले. अमेरिकने ह्युएईवर अमेरिकन नागरिकांची माहिती चोरण्याचा आरोप केला होता.

Leave a Comment