अशा पद्धतीने ओळखा गाडीतील बनावट स्पेअर पार्ट्स


भारतात गाड्यांमध्ये बनावटी पार्ट्स मोठ्या प्रमाणात लावले जातात. बाजारात देखील मोठ्या प्रमाणात महागड्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स देखील अगदी स्वस्तात मिळतात. अनेक ठिकाणी मारण्यात आलेल्या छाप्यात करोडोंचे स्पेअर पार्ट्स जप्त करण्यात आले आहेत.

गैरकायदेशीर सर्विस सेंटर –
बनावटी स्पेअर पार्ट्सची चौकशी करण्यासाठी होंडाने इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स इंफोर्समेंट हे अभियान 2017 मध्ये चालवले होते. त्यांना देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये गैरकायदेशीर सर्विस सेंटर्स आढळून आले. कंपनीने 3  वर्षात 90 हजार स्पेअर पार्ट्स जमा केले असून, त्याची किंमत करोडो रूपये आहे.

दररोज वापरात असलेल्या सामानात हेरफेर –
ऑथेंटिकेशन सॉल्यूशन प्रोवाडर्स असोसिएशनच्या आकड्यांनुसार, देशातील बनावटी पार्ट्सचा बाजार दरवर्षी एक लाख करोडचा असून, त्यामुळे सरकारला 40 हजार करोड रूपये टँक्सचे नुकसान होते. यामध्ये सर्वाधिक फर्टीलाइजर, पेस्टीसाइड्स, रोजचे उपयोगी सामान, ऑटो पार्ट्स आणि फार्मा सेक्टर या गोष्टी आहेत.

बनावटी पार्ट्सचा बाजार 22 हजार करोड रूपये –
ऑटो सेक्टरमध्ये बनावटी पार्ट्सचा उद्योग दरवर्षी 22 हजार करोड रूपयांचा आहे. मागील पाच वर्षात याचा व्यापार मोठ्या तेजीने वाढला आहे. बनावटी पार्ट्समुळे ऑरिजनल मॅन्युफॅक्चरला मोठ्या प्रमाणात फटका बसतो. एसीचे फिल्टर, रिंग, पिस्टन, पट्टे, क्लच प्लेट, स्टीयरिंग सस्पेंशन आणि ब्रेक वायर बाकीच्या ऑटो पार्ट्सची बाजारात मोठी विक्री असून, या सर्वांचे बनावटी पार्ट्स विकले जातात.

30 ते 40 टक्के बनावटी पार्ट्स –
ऑथेंटिकेशन सॉल्यूशन प्रोवाडर्स असोसिएशनचे अध्यक्ष नकुल पसरीचा यांचे म्हणणे आहे की,  2018-19 मध्ये ऑटो ऑफ्टर सेक्टर हे 9.6 टक्क्यांनी वाढून 67,491 करोड पर्यंत पोहचला असून, जो आधी 61,601 करोड रूपये होता. रिटेल मार्केटमध्ये 30-40 टक्के सहभाग हा बनावटी पार्ट्सचा आहे.

20 टक्के अपघात बनावटी पार्ट्समुळे  –
एका रिपोर्ट्नुसार, देशात होणारे 20 टक्के अपघात हे बनावटी पार्ट्समुळे होतात. रिपोर्ट्मध्ये म्हटले आहे की, लोक हे बनावटी पार्ट्स खरे असल्याचे समजून खरेदी करतात व यामुळे सरकारला 2,200 करोड रूपये टँक्सचे नुकसान होते.

जुन्या गाड्यात सर्वाधिक वापर –
अनेक ऑपरेटर्स एका रात्रीत बनावटी पार्ट्स घेऊन येतात. चीनवरून येणाऱ्या पार्ट्सचे प्रमाण मोठे आहे. जर तुम्ही जूनी कार अथवा मोटरसाईकल विकत घेणार असाल तर त्यामध्ये जुने पार्ट्स नक्की असणार. कारण गाड्या जसजशा जुन्या होतात. लोक स्वस्त पार्ट्स टाकतात व स्वस्त पार्ट्स् हे बनावटी असतात. डिलर देखील जुन्या गाड्यांमध्ये बनावटी पार्ट्स वापरतात.

सरकारने शोधले नवीन तंत्र  –
सरकारने यावर उपाय म्हणून मोटर व्हिकल नियमांतर्गत एक नॉटिफिकेशन जारी केले आहे. सरकारने गाड्यांच्या पार्ट्सवर न दिसणारे मायक्रोडॉट्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. या डॉट्सना बघण्यासाठी सुक्ष्मदर्शी व पराबँग प्रकाश स्रोताची आवश्यता लागेल यामुले बनावटी पार्ट्स आणि गाड्या चोरींवर प्रतिंबध लागेल.

चोरी गेलेली कार शोधू शकाल –
हे मायक्रो डॉट्स सुक्ष्म आकाराचे कण असतील. ज्यामध्ये मार्किंग अथवा संख्या नमूद केलेली असेल. या मायक्रोडॉट्सच्या युनीक आयडीला कारच्या रजिस्ट्रेशन नंबरबरोबर जोडले जाईल. यामुळे गाडीचे तुकडे जरी केले तरी रजिस्ट्रेशन नंबरमुळे लगेच याची माहिती मिळेल.

तुम्ही ओळखू शकता ओरिजनल प्रोडक्ट –
कंपनीच्या पँकिंगवर युनिक पार्ट्स आयडेंटिफिकेशन कोड लिहिलेला असतो. तसेच हिरो मोटोकॉर्पच्या कोणत्याही वस्तूवरील किंमत असणाऱ्या स्टिकरवर लिहिलेला युपीआय कोड  9266171171 या नंबरवर मेसेज करून माहिती मिळवू शकता. हिरो कंपनीच्या ओरिजन प्रोडक्टचा कोड अल्ट्रा वायलेट लाईटीमध्ये दिसतो. यामध्ये थर्मोक्रोमिक इंक (काळा) ने ‘GENUINE’ शब्द लिहिलेला असतो.

डिस्काउंट मिळत असेल तर –
जर तुम्हाला एखाद्या पार्ट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट मिळत असेल तर समजून जाकी ते पार्ट्स बनावटी आहेत. कंपनीच्या शोरूममध्ये फोन करून किंमतीची नक्की माहिती करून घ्यावी. तसेच जीएसटी बिल नक्की घ्यावे.

कंपनीमध्येच सर्विस करावी –
बनावटी पार्ट्सपासून वाचण्यासाठी ग्राहकांनी कधीही कंपनीच्या ऑथराइज्ड डीलरकडूनच गाडी निट करून घ्यावी. यामुळे कंपनी तुम्हाला पार्ट्सची वॉरंटी देखील देते.

Leave a Comment