अंबाती रायडू पुन्हा दिसणार क्रिकेटच्या मैदानावर


भारतीय संघाचा माजी क्रिकेटपूट अंबाती रायडूने विश्वचषक स्पर्धेत संघामध्ये निवड न झाल्याने निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र आता पुन्हा एकदा रायडूचे नाव चर्चेत आले आहे. याचे कारण रायडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर खेळताना दिसणार आहे.

19 ऑगस्टला चैन्नईमध्ये होणाऱ्या टीएनसीए एकदिवसीय स्पर्धा पार्थसार्थी ट्रॉफीमध्ये रायडू खेळताना दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर प्रथमच रायडू मैदानात दिसण्याची शक्यता आहे.

निवृत्तीच्या मागील कारण –
इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वकप स्पर्धेमध्ये अंबाती रायडूला भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. त्याच्या जागी विजय शंकरची निवड करण्यात आली होती. निवड समितीने विजय हा थ्रीडी प्लेयर असल्याचे म्हटले होते. यावर देखील रायडूने टिप्पणी केली होती. विजय दुखापतग्रस्त झाल्यानंतर देखील अंबातीला स्थान न देता मयंक अग्रवालची निवड करण्यात आली होती. संघात स्थान न मिळाल्याने अखेर रायडूने निवृत्तीची घोषणा केली होती.

निवृत्तीनंतर रायडू ग्लोबल टी10 लीगमध्ये खेळू शकतो. निवृत्तीनंतर युवराज सिंगने देखील टी-20 लीगमध्ये खेळण्यास सुरूवात केली होती.

Leave a Comment