शहीद भावाच्या बंदुकीला बहिणीने बांधली राखी


१५ ऑगस्टला देशभर मोठ्या आनंदात रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. त्यात एका बहिणीचे रक्षाबंधन अनेकांच्या डोळ्यांच्या कडा भिजवून गेले. कविता कौशल हिने सहाय्यक कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असताना ऑक्टोबर २०१८ मध्ये नक्षलवाद्यांशी मुकाबला करताना शहीद झालेल्या भाऊ राकेश कौशल याच्या बंदुकीला राखी बांधून त्याची आठवण जागी ठेवली. राकेश अन्य दोन पोलीस व एक कॅमेरामन याच्यासह नक्षलवाद्यांचा मुकाबला करताना शहीद झाले आहेत.

कॉन्स्टेबल कविताला राकेश यांच्या जागी अनुकंपा तत्वावर पोलीस दलात नोकरी मिळाली आहे. तिला सुरवातीला ऑफिस काम देण्यात आले होते पण जेव्हा तिने महिला कमांडो पथक पहिले तेव्हा या पथकात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. भाऊ वापरत होता तीच बंदूक तिने तिच्यासाठी द्यावी असा आग्रह धरला. कविता सांगते मला दंतेश्वरी सेनेत दाखल व्हायचे होते, मी तसा आग्रह धरला होता. माझा भाऊ वापरत होता तिच बंदूक मला द्या अशीही मी विनंती केली. दर राखीला तो नेहमीच येत असे. त्याची उणीव भासत आहे. म्हणून मी त्याच्या बंदुकीला राखी बांधली. त्याच्या मृत्यूचा बदला मला घ्यायचा आहे.

Leave a Comment