हाय परफॉरमन्स सुपरकार बनविणाऱ्या अमेरिकन कंपनीने म्हणजे रेझवानी मोटर्सने जगातील सर्वाधिक पॉवरफुल एसयुवी सादर केली असून ही प्रोडक्शन, म्हणजे बाजारात विक्रीला येणारी एसयुवी आहे. स्टँडर्ड, एक्स आणि मिलिटरी अश्या तीन व्हेरीयंट मध्ये ती बाजारात आणली गेली आहे. बुलेटप्रूफ सह अनेक अन्य अत्याधुनिक फीचर्सने ही एसयुव्ही आकर्षक बनली आहे.
सर्वात पॉवरफुल एसयुव्ही, किंमत २.५ कोटी
टँक एसयुव्ही ला ६.२ लिटर व्ही ८ सुपरचार्ज्ड इंजिन दिले गेले असून गाडीची बांधणी अतिशय मजबूत आणि मस्क्युलर लुक आहे. स्लिक हेडलँप, एलइडी बार, ब्लॅक ग्रील, रुंद साईड प्रोफाइल, मॅट फिनिश मिलिट्री पेंट असून ही ऑफ रोड एसयुव्ही आहे. तिला स्टीलफ्रेम बॉडी, स्पोर्ट्स सस्पेन्शन सह रुंद ऑफ रोड टायर आहेत. मिलिटरी व्हेरीयंटमध्ये बुलेटप्रुफ ग्लास, दरवाजे, फ्लॅट टायर, स्फोटकापासून सुरक्षा, सेल्फ सिलिंग गॅस टँक, थर्मल कॅमेरे, खास लाईट, सायरन, स्मोक स्क्रीन अशी फीचर्स आहेत.
स्टँडर्ड व्हेरीयंटची किंमत १.५५ लाख डॉलर्स म्हणजे १.०५ कोटी, मिलिट्रीची किंमत २.१५ कोटी तर एक्सची किंमत २.४८ कोटी रुपये आहे.