लेहमध्ये आजपासून आदि महोत्सव सुरु


जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यावर आणि लेहला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यावर तेहे आदि महोत्सवाची सुरवात होत असून हा महोत्सव १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात २० राज्यातील १६० आदिवासी जमाती सहभागी होत असून महोत्सवाचे उद्घाटन गव्हर्नर सत्यपाल मलिक यांच्या हस्ते होत आहे. आदिवासी विभागाचे मंत्री अर्जुन मुंडा हेही उत्सवाला उपस्थित राहत आहेत.

गृहमंत्री अमित शहा यांनी या उत्सवासाठी पत्र संदेश पाठविला असून त्यात यामुळे आदिवासी जनजातीना आर्थिक संपन्नता मिळण्याची संधी प्राप्त होईल असे म्हटले आहे. पोलो ग्राउंडवर होत असलेल्या या महोत्सवात आदिवासी संस्कृती, शिल्पे, कलाकुसर, वनौषधी संरक्षण यांचे दर्शन घडेल आणि आदिवासी हस्तकला वस्तू विक्रीसाठी व्यापारी पातळीवर मंच उपलब्ध होऊ शकेल. परिणामी आदिवासीना आर्थिक संपन्नता येण्यास मदत मिळेल असा उद्देश आहे. आदिवासी मंत्रालयाचा विभाग यासाठी मार्केट डेव्हलपर म्हणून काम करणार आहे.

Leave a Comment