येथे सुरु झाला होता भारतातला पहिला सायबर कॅफे


गोष्ट आहे सुमारे तेवीस वर्षापूर्वीची. म्हणजे १९९६ ची. हा दिवस यासाठी महत्वाचा ठरला होता कारण या दिवशी मुंबईच्या कॅफे हॉटेल लीला कॅम्पस्कीमध्ये भारतातील पहिला सायबर कॅफे सुरु झाला होता. आज इंटरनेटने जगाचा कानाकोपरा व्यापला असून कवडीमोल किमतीत आज कुणीही इंटरनेटचा वापर करू शकते आहे. भारताबद्दल बोलायचे तर देशात इंटरनेटची सुरवात झाली १५ ऑगस्ट १९९५ मध्ये. द इंडियन टेक्नोमिस्टच्या म्हणण्यानुसार विदेश संचार निगम लिमिटेड म्हणजे व्हीएसएनएलने ही सेवा सुरु केली होती.

मात्र पहिला सायबरकॅफे सुरु झाला तो १९९६ मध्ये. त्याकाळी इंटरनेट ही श्रीमंती चैन होती कारण तेव्हा त्याचा दर तासाला ८०० रुपये इतका होता. १९९५ मध्ये ही सेवा सुरु झाली तेव्हा प्रोफेशनल युजरला डायल अप साठी ५ हजार रुपये खर्च करावे लागत आणि त्याला ९.५ केबीपीएस स्पीड त्यात मिळत असे. अव्यावसायिक त्यासाठी १५ हजार रुपये मोजत असत. कमर्शियल युजरसाठी लीज कॅटेगरी होती आणि ९.६ केबीपीएस स्पीडसाठी वर्षाला त्यांना २,४०,००० रुपये, ६४ केबीपीएस साठी ६ लाख तर १२८ केबीपीएस साठी १० लाख रुपये भरावे लागत असत, आज हाच दर १ जीबी साठी साडेअठरा रुपयांवर आला आहे.

त्यावेळी सर्विस प्रोव्हायडर फक्त लीज लाईनच अॅक्सेस करू शकत असत तर डायलअप मध्ये युजर्स पूर्ण वर्षात २५० तास इंटरनेटचा वापर करू शकत असत.

Leave a Comment