पर्यावरण संरक्षणासाठी या शहराने घेतला खास निर्णय


सतत तीन वेळा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावणाऱ्या मध्य प्रदेशमधील इंदौर शहरात प्लॅस्टिकच्या बॉटलवर बंदी आणण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अनेक संस्थांमध्ये पाणी प्लॅस्टिकच्या बॉटल ऐवजी तांब्याच्या लोट्यात दिले जात आहे. तर नगरपालिकेने शहराला डिस्पोजल फ्रि बनवण्याठी भांडी देण्यास देखील सुरूवात केली आहे.

पोलिसांच्या उप महानिरिक्षकांच्या कार्यालयात प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये पाणी देणे पुर्णपणे बंद करण्यात आले आहे. एसएसपी रुचिर्वान मिश्र यांनी स्वच्छता मिशन अंतर्गत प्लॅस्टिकच्या वस्तू, बॉटलवर प्रतिबंध घातला असून, तांब्याच्या लोट्यात पाणी देण्यास सुरूवात केली आहे.

पोलिस अधिक्षक सुरज वर्मा यांचे म्हणणे आहे की, शहर स्वच्छतेच्या बाबतीत सतत तीन वर्ष पहिल्या क्रमांकावर आहे आणि शासनाचा नियम आहे की, प्लॅस्टिक वस्तूंचा वापर करू नये.

पर्यावरण संरक्षणासाठी आयआयएम इंदौरने देखील मोठे पाऊल उचलले आहे. कॅम्पसमध्ये प्लॅस्टिकच्या बॉटलवर बंदी घातली असल्याने विद्यार्थी, शिक्षक किंवा अन्य कोणीही प्लॅस्टिकच्या बॉटलचा उपयोग करत नाही.

आता आयआयएमच्या आयोजकांनी देखील पाहुण्यांना पितळच्या अथवा काचेच्या ग्लासात पाणी देण्यास सुरूवात केली आहे. आयआयएमने मिटिंग, वर्कशॉप किंवा अन्य कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांकडून एक झाड लावून घेण्याचा देखील निर्णय घेतला आहे. झाडावर पाहुण्यांच्या नावाचा बोर्ड लावण्यात येईल.

जन विकास सोसायटीचे डायरेक्टर फादर रोई थॉमस म्हणाले की, इंदौरला डिस्पोजल आणि प्लॅस्टिक फ्री बनवण्यासाठी ही आणखी सार्थक योजना आहे. यामुळे इंदौरला नवीन ओळख मिळेल.

या आधी शहराच्या नगरपालिकेने शहराला डिस्पोजल फ्री बनवण्यासाठी ‘भांड्यांची बँक’ बनवली आहे. जो व्यक्ती आपल्या कार्यक्रमात डिस्पोजल भांड्याचा वापर करणार नाही, अशांना पालिका भांडी पुरवणार आहे व यासाठी कोणतेही भाडे आकारले जाणार नाही.

याआधी इंदौर देखील अन्य शहरांप्रमाणेच होते. येथे जागे-जागेवर कचऱ्याचा ढिग साचत असे. 2015 मध्ये स्वच्छता सर्वेक्षणामध्ये इंदौर 25 व्या स्थानवर होते व आज पहिल्या क्रमांकावर आहे. इंदौरसाठी येथे पोहचणे सोपे नव्हते. 2011-12 मध्ये इंदौर 61 व्या स्थानावर होते.

पालिका आणि स्थानिक लोकांनी मिळून शहरातील परिस्थिती बदलली. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2017 मध्ये इंदौर प्रथम क्रमांकावर होते. 350 पेक्षा अधिक छोट्या कचऱ्याच्या गाड्या संपुर्ण शहरात फिरतात.

Leave a Comment