Video : अन् जेव्हा अस्वलच गाण्यावर थिरकू लागते


अमेरिकेतील ओहियो येथील एक्रॉन प्राणीसंग्रहालयात असे काही बघायला मिळाले की, त्याने सर्वच जण आश्चर्यचकित झाले. या प्राणीसंग्रहालयात अस्वलाला डान्स करताना बघितले गेले. या अस्वलाचे नाव छेयेने सांगितले जात आहे. कॅमेऱ्यामध्ये अस्वल आपले शरीर खाजवताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा अस्वल हिरो झाला आहे.

व्हिडीओमध्ये दिसते की, छेयेने डान्स करत आहे. मात्र तो आपले शरीर भिंतीच्या मदतीने खाजवत आहे. अनेक जण म्हणाले की, हा अगदी जंगल बूक चित्रपटातील बल्लू कँरेक्टर सारखा आहे. जो त्याच्या सारखीच अँक्टिंग करत आहे.

Itchy bear

Are you itching to spend this beautiful weekend outside? We have you covered! Visit your Akron Zoo this Saturday and Sunday – we're open 10 a.m. – 5 p.m.

Akron Zoo ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಆಗಸ್ಟ್ 9, 2019

एक्रॉन झूने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, तुम्हालाही विकेंडमध्ये बाहेर फिरण्याची अशीच मस्ती आहे ?

मागील आठवड्यात या व्हिडीओला फेसबूकवर शेअर करण्यात आले होते. आतापर्यंत तब्बल 30,000 जणांनी हा व्हिडीओ पाहिला असून, शेकडो जणांनी कमेंट्स केल्या आहेत.

अस्वल आपले क्षेत्र निश्चित करण्यासाठी व आपल्या साथीदाराला शोधण्यासाठी अशाप्रकारे शरीर खाजवत असतात.