जाणून घ्या पोस्ट ऑफिसमधील रिकरिंग डिपॉझिटबाबत


इंडिया पोस्टची संपुर्ण देशभरात दीड लाखांपेक्षा अधिक डाकघरांचे नेटवर्क आहे. याद्वारे ते ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवा पुरवतात. इंडिया पोस्टद्वारे ज्या नऊ बचत योजनेची सेवा पुरवली जाते त्याची संपुर्ण माहिती indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. इंडिया पोस्टनुसार, यावर दरवर्षी 7.2 टक्के व्याज मिळते. या डाकघरांमधील बजत योजनांवरील व्याज दर छोट्या बचत योजनांनुसार व्याज दर निश्चित केले जाते. यामध्ये दर तिन महिन्यांनी बदल केला जातो.

पोस्ट ऑफिस आवर्ती खाते (रेकरिंग डिपॉजिट) हे रोख रक्कम तसेच चेकद्वारे देखील उघडले जाते. डाकघरामध्ये कितीही खाती उघडता येतात. यामध्ये खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने देखील उघडता येते. 10 वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीचे खात उघडता येते.

पोस्ट ऑफिस आवर्ती खात्याच्या मॅच्युरिटीचा कालावधी हा 5 वर्षांचा असतो. तसेच यामध्ये एक एक वर्ष वाढ करत 5 वर्ष हे खाते ठेवता येते. हे खाते कमीत कमी 10 रूपयांमध्ये उघडले जाते.

पोस्ट ऑफिस आवर्ती खात्यामध्ये कितीही रक्कम जमा करता येऊ शकते.  एका वर्षानंतर शिल्लक रक्कमेच्या 50 टक्के रक्कम काढण्याची परवानगी आहे. मात्र या रक्कमेला निश्चित मुदतीच्या आधी निश्चित व्याजदरासाठी एक रक्कमी भरणे गरजेचे आहे.

मासिक हप्ता तुम्ही कोणत्याही तारखेला भरू शकता. जर मासिक हप्ता भरण्यास विसरले तर प्रत्येक पाच रूपयांवर पाच पैसे डिफॉल्ट शुल्क आकारले जाते. जर कोणत्याही आरडी खात्यामध्ये आधीचे डिफॉल्ट शुल्क भरणे बाकी असेल तर आधी ते शुल्क भरणे गरजेचे असते व त्यानंतर मासिक हप्ता भरावा लागतो.

Leave a Comment