आता मोबाईलच्या माध्यमातून करा गाडीच्या टायरची देखभाल


सध्याच्या डिजीटल युगात सर्वकाही स्मार्ट झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. आज आपण बहुतांश गोष्टी मोबाईलच्याच माध्यमातून चुटकी सरशी करतो. सध्या इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारात स्मार्टफोन, स्मार्टवॉच, स्मार्ट लाईट्स, स्मार्ट होम, स्मार्ट कार आणि आता स्मार्ट टायरही उपलब्ध झाले आहेत. असाच टायर जे के टायर कंपनीने तयार केला आहे की, ज्या टायरवर तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून लक्ष ठेवू शकता. कंपनीने एक सेन्सर त्या टायरमध्ये जोडलेले आहे.

गाडीचे टायर ठिक असणे हे प्रत्येक गाडीसाठी महत्त्वाचे असते. कारण जर टायरमध्ये गडबड असेल तर त्याचा फटका गाडीच्या कामगिरीवर होऊ शकतो. काही लोक बऱ्याचदा टायरवर लक्ष देत नाहीत आणि खराब टायरचा वापर करतात, एअर प्रेशर ठिक ठेवत नसल्यामुळेच जे के टायर कंपनी एक नवीन सेंसर घेऊन आला आहे. जो टायरची काळजी घेण्यात तुमची मदत करेल.

ट्रिल सेन्सरच्या मदतीने दबाव निगराणी प्रणाली (TPMS) जे के टायरने सादर केल्यामुळे मोबाईलवरही तुम्ही टायर पाहू शकतात. तसेच तुम्ही या माध्यमातून टायरचे तापमानही पाहू शकतात. तुम्ही या प्रणालीद्वारे टायर संबधित प्रत्येक गोष्टीची माहिती जाणून घेऊ शकता. टायरमध्ये किती हवा याची माहिती तुम्हाला मिळणार आहे. कंपनीनुसार ट्रिल सेन्सर देशात 700 डीलर्सकडे उपलब्ध आहे.

Leave a Comment