सोशल मीडियात सुरु आहे मेघालय पोलिसांच्या त्या ट्विटची चर्चा


सध्याच्या डिजीटल युगात सर्व काही स्मार्ट झाले असल्यामुळे सर्व कामे कशी चुटकी सरशी होतात हे तर आपल्याला चांगलेच माहिती आहे. त्यातच सर्वच राज्यांची पोलीस दल हे गेल्या मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. त्यात मुंबई पोलीस असतील किंवा अन्य महानगर पोलीस विभागांचा समावेश असेल जनतेच्या संपर्कात ट्विटरच्या माध्यमातून राहण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो.


पण सध्या त्याच सोशल मीडियात मेघालय पोलिसांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. मेघालय पोलिसांनी अमली पदार्थांच्या ऐवजी मेघालयात अंमली पदार्थ विकणारे रसनाची पावडर विकत असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी केलेले ट्विट पाहून कोणालाही हसल्याशिवाय राहणार नाही.

यापूर्वी एका अनोख्या अंदाजात गांजा पकडल्याची माहिती आसाम पोलिसांनी दिली होती. आपल्या कामगिरीची बातमी देण्यासाठी आसाम पोलिसांनी एक ट्विट केले होते. ज्यांचा गांजा हरवला आहे त्यांनी काळजी करू नये, थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले होते. त्याचबरोबर त्यांनी या ट्विटसोबत डोळा मारणारा एक इमोजी देखील शेअर केला होता. त्यानंतर मेघालय पोलिसांनी केलेल्या ट्विटची सध्या चर्चा सुरू आहे.

Leave a Comment