‘हा’ क्रिकेटपटू म्हणतो प्रत्येक क्रिकेटपटूच्या घरात असायला हवा स्ट्रिप क्लब


भारतीय संघाविरोधात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने 72 धावांची वेगवान खेळी केली. त्याच्या निवृत्तीची चर्चा विश्वचषक स्पर्धेरम्यान सुरू झाली होती.

भारताविरुद्धच्या मालिकेनंतर आपण निवृत्त होणार असल्याचे गेलने जाहीर केले होते. पण आता गेलने, मी अजुन निवृत्ती जाहीर केलेली नाही. मी पुढच्या नोटीसीपर्यंत खेळत राहीन, असे म्हटले आहे.

गेलची क्रिकेटविश्वात युनिवर्सल बॉस या नावाने ओळख असली तरी, आपल्या लक्झरी आणि आलिशान आयुष्यासाठी गेल नेहमी ओळखला जातो.

बिनधास्त आयुष्य जगणाऱ्या गेलने मनोरंजनासाठी चक्क आपल्या घरात स्ट्रिप क्लब तयार केला होता. पोल डान्सचीही व्यवस्था येथे करण्यात आली होती. यावर, प्रत्येक क्रिकेटपटूच्या घरात असा स्ट्रिप क्बल असायले हवे, असे मत गेलने व्यक्त केले होते.

दरम्यान, आपल्या खाजगी आयुष्याचे आणि आलिशान गाड्यांचे फोटो गेल नेहमीच सोशल मिडीयावर पोस्ट करत असतो. गेलकडे सद्यस्थितीत मर्सिडीज, ऑडी आणि फरारी यांसारख्या महागड्या गाड्यांचा ताफा आहे.

जगातील सर्वात महाग विंटेज रॉल्स रॉयस कारही गेलकडे आहे. तो त्याच्याकडे असलेल्या विंटेज रोल्स रॉयल्ससोबत सतत फोटो टाकत असतो. गेलकडे असलेली ही कार 1950ची मॉडेल आहे. नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी गेल चर्चेत असतो. मुलींसोबत शेअर केलेल्या फोटोमुळे गेल चर्चेत आला होता.

Leave a Comment