स्वातंत्र्यदिनी भलत्याच शुभेच्छा दिल्याने ही अभिनेत्री झाली ट्रोल


अभिनेत्री ईशा गुप्ताला सध्या सोशल मीडियावर ट्रोलला सामोरे जावे लागत आहे. 15 ऑगस्टच्या सकाळी ट्विट करत ईशा गुप्ताने चुकून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी प्रजासत्ताक दिनाच्याच शुभेच्छा दिल्या. यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जाऊ लागले. चुक समजल्यावर ईशाने आणखी एक ट्विट करत लिहिले की, तिचे ट्विटर अकाउंट हँक झाले आहे.

ईशाच्या ट्विटर अकाउंटवरून करण्यात आलेल्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…जय हिंद. या ट्विटनंतर लोकांनी ट्रोल करायला सुरूवात करताच ईशाने दुसरे ट्विट करत अकाउंट हँक झाले असल्याचे सांगितले. तिने लिहिले की, ट्विटर अकाउंट हँक झाले आहे. प्लीज येणारे मेसेज उघडू नका व कोणत्याही गोष्टीवर लक्ष देऊ नका.

 

मात्र तरीही युजर्सनी तिच्या पहिल्या ट्विटवर ट्रोल करण्यास सुरूवात केली.