मारूती सुझुकी लवकरच लाँच करणार शानदार ‘जिप्सी’


मारूती कंपनी आपली 28 वर्ष जुनी एसयुवी नवीन रूपात लाँच करण्याची योजना बनवत आहे. मारूती कंपनीने ऑक्टोंबर 208 मध्ये जाहीर केले होते की, एप्रिल 2019 पासून जिप्सीचे उत्पादन बंद करणार आहे. सध्या भारतीय सैन्यात मारूती जिप्सीचा वापर आताही होतो. तर आता रिपोर्टनुसार, मारूती आता जिप्सीच्या जागी नवीन गाडी लाँच करणार आहे.

रिपोर्टनुसार, मार्च 2020 मध्ये मारूती जिप्सीच्या जागी चौथ्या पिढीतील जिम्नी लाँच करणार आहे. मारूती जिप्सी देखील पहिल्या पिढीची  सुझुकी जिम्नीचे एक वर्जन होते. मारूती  सुझुकी जिमनी सिएरा प्रमाणेच एक मिनी एसयूवी बनवत आहेत. नवीन एसयुवी खडतर रस्त्यांवर देखील सहज चालू शकेल. तसेच रोजच्या वापरासाठी देखील आरामदायक असेल.

जिम्नीला मागील वर्षी जापानमध्ये लाँच करण्यात आली असून, सध्या अनेक देशात याची विक्री सुरू आहे. याच्या ऑफरोडर वैशिष्ट्यांमुळे लोकांना ही गाडी खुपच आवडत आहे. तसेच आधीच्या तुलनेत अधिक पावरफुल, सुरक्षित आणि मॉर्डन आहे. सध्या जिम्नी जापानमध्ये बनत असून तेथूनच बाकी देशांना निर्यात केली जाते. तसेच जेव्हा भारतात याची निर्मिती सुरू होईल तेव्हा भारतातून देखील अनेक देशात निर्यात सुरू होईल.

वृत्तांनुसार, कंपनी या मिनी एसयुवी गाडीला मारूती  सुझुकीच्या गुजरातच्या फॅक्टरीमध्ये बनवणार आहे.  सुझुकी याच्या मोठ्या व्हिल बेस वर्जनवर काम करत आहे. ज्यामध्ये पाच दरवाजे आणि आत बसण्यास मोठी जागा असेल. भारतात याचे लाँग व्हीलबेस वर्जन खूप चालले होते. सध्या जिम्नी केवळ तीन दरवाजांबरोबर होते. याला भारतामध्ये मोठी पसंती नाही.

सुझुकी जिम्नी दोन इंजिनच्या पर्यायांबरोबर 660 सीसी सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 1.5 सिलेंडर च्या पेट्रोल इंजिन सोबत येते. 660 सीसीच्या इंजिनला जापानमध्ये मोठी पसंती आहे. तर बाकी ठिकाणी 1.5 लीटरचे इंजिन पसंद केले जाते. हे इंजिन याआधी अर्टिगा आणि सियाजमध्ये देण्यात आलेले आहे व लवकरच विटारा ब्रेजामध्ये देखील देण्यात येणार आहे. पाच स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सचे हे इंजिन 104 बीएचपीची पॉवर आणि 108 एनएमचा टार्क देते.

भारतात लाँच करण्यात येणाऱ्या जिम्नीला फोर स्पीड टॉर्क कनवर्टरबरोबर देखील लाँच केले जाऊ शकते. याचबरोबर फोरव्हील ड्राइव असणारे वर्जन देखील असेल. यामध्ये रग्ड लँडर बेस्ट चँसिस, एअरबँग्स, एबीएस, ईएसपी, पावर स्टेअरिंग, रिवर्स पार्किंग सेंसर्स, एअर कंडिशनिंग, अँड्राईड ऑटो आणि अँपल कारप्ले सपोर्ट असणारे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देखील असेल. याची किंमत 5 ते 7 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.