आजपासून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास पडू शकते महाग


नवी दिल्ली – मोटार वाहन दुरुस्ती विधेयक 2019 संमत झाले असून देशाचे राष्ट्रपती राम नाथ गोविंद यांनीही त्याला मंजुरी दिली आहे. आता हे विधेयक 15 ऑगस्टपासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. या विधेयकात वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भारी दंड वसूल करण्याची तरतूद आहे. याशिवाय रुग्णवाहिका किंवा अग्निशमन दलासारख्या आपत्कालीन वाहनांना मार्ग न दिल्यास 10,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल. या व्यतिरिक्त, एखाद्याचा परवाना रद्द झाला असेल आणि तरीही तो वाहन चालवत असेल तर त्याला 10,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. या अहवालात आम्ही तुमच्यासाठी त्या दंडाची यादी आणली आहे, जो दंड याआधी नियम तोडण्यासाठी घेतला जात होता आणि 15 ऑगस्टनंतर किती दंड भरावा लागेल याची माहिती आम्ही तुमच्यासाठी आणली आहे.

मोदी सरकारचा हे विधेयक लागू करण्यामागे नेमका काय हेतू होता? तर, रस्ता सुरक्षेच्या सुरक्षिततेचा विचार करून, जे 18 वर्षाखालील वाहन चालवितात किंवा परवान्याशिवाय वाहन चालवितात किंवा धोकादायकपणे वाहन चालवितात, दारू पिऊन वाहन चालवतात, जास्त वेगाने गाडी चालवतात त्यांच्यासाठी आता कठोर नियम लागून केले जाणार असून त्याचबरोबर त्यांच्याकडून जबर दंड देखील वसूल केला जाणार आहे. म्हणूनच, कोणत्याही वाहतुक नियमाचे उल्लंघन केल्यास 10 टक्के जास्त दंड भरावा लागू शकतो. 15 ऑगस्टपासून दंडाची नवीन दर यादी लागू केली जाईल.

असे आहेत नवे नियम आणि दंड
आता जर एखाद्याला लायसेन्सशिवाय वाहन चालविताना पकडले गेले असेल तर त्याला 500 रुपयांऐवजी 5000 रुपये दंड भरावा लागेल.

जर कोणाचे लायसेन्स सस्पेंड झाले असेल आणि तरी देखील तो वाहन चालवित असल्यास 10,000 रुपये दंड भरावा लागेल, जो यापूर्वी 500 रुपये इतका होता.

जर कोणी ओव्हर स्पीड वाहन चालवत असेल तर त्याला 400 रुपयांऐवजी 1000 ते 2000 रुपयांचा दंड भरावा लागेल.

जर कोणी रॅश ड्रायव्हिंग करताना पकडला गेला तर, दंड 1000 रुपयांऐवजी 5000 रुपये असेल.

ड्रिंक अँड ड्राईव्ह चलान आता 2000 रुपयांवरून 10,000 पर्यंत करण्यात आले आहे.

सीट बेल्टशिवाय ड्रायव्हिंग करण्यासाठी 100 रुपयांऐवजी 1000 रुपयांचे चलान आवश्यक असेल.

लाल दिवा असताना गाडी जम्प केल्यास किंवा वाहन चालविताना मोबाईल फोनचा वापर केल्यास 500 रुपये दंड आणि 1 वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते. यापूर्वी हा दंड 100 रुपये इतका असायचा.

दुचाकीवर दोन पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्यास 2 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो आणि 3 महिन्यांसाठी परवाना रद्द केला जाऊ शकतो.

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवण्याचा दंडही 100 रुपयांवरून 1000 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

आता विना इंश्योरंस वाहन चालवताना पकडले गेल्यास 1000 रुपयांऐवजी 2000 रुपये दंड भरावा लागेल.

रुग्णवाहिका किंवा इतर कोणत्याही आपत्कालीन वाहनाचा रस्ता अडवल्यास आतापासून 10,000 रुपये दंड आकारला जाईल.

प्रवासी कारमध्ये मर्यादेपेक्षा जास्त प्रवाशी असतील तर, आता प्रती प्रवासी 1000 रुपये दंड भरावा लागेल.

याव्यतिरिक्त, एखाद्या अल्पवयीन चालकाला बेपर्वाईने वाहन चालविताना पकडले गेले असेल तर वाहन मालकाला किंवा त्याच्या पालकांना 25,000 रुपये आणि 3 वर्षांचा तुरूंगवासाची दंड ठोठावला जाऊ शकतो आणि अल्पवयीनावर अल्पवयीन न्यायालय कायद्यांतर्गत खटला चालविला जाईल.

Leave a Comment