कोहलीची ‘विराट’ विक्रमाला गवसणी


भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर शानदार प्रदर्शन मालिकेत विजय मिळवला. भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात डर्कवथ लुईस नियमानुसार, 6 विकेट्सने विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. याआधी भारताने टी-20 मालिकेत देखील वेस्ट इंडिजला 3-0 ने असा पराभव केला होता.

या सामन्यात 99 चेंडूत 114 धावांची शानदार शतकीय खेळी खेळणाऱ्या विराट कोहलीला मँन ऑफ मँच पुरस्कार देण्यात आला. सिरीजमध्ये लगातर दोन शतक ठोकत मँन ऑफ द सिरिज पुरस्कार देखील आपल्या नावावर केला. या शतकीय खेळींबरोबर कोहलीने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट (कसोटी+एकदिवसीय+टी-20) मध्ये 2010 ते 2019 मध्ये 20,000 धावा पुर्ण केल्या आहेत. एका दशकात 20,000 धावा पुर्ण करणारा विराट कोहली पहिलाच खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे त्याने हा विक्रम साडे आठ वर्षांमध्येच पुर्ण केला आहे.

विराटने 2010 पासून आतापर्यंत 371 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 57.03 सरासरीने 20,018 धावा केल्या आहेत. यामध्ये तब्बल 67 शतकांचा समावेश आहे. विराट भविष्यात देखील अनेक विक्रम करण्याची शक्यता आहे. आतापर्यंत एका दशकता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगच्या नावावर होता. त्याने 2000 च्या दशकात 18,962 धावा केल्या होत्या. त्यानंतर एका दशकात सर्वाधिक धावा महिला जयवर्धने 16,304 धावा, कुमार संगकारा 15,999 धावा, सचिन तेंडूलकर 15,962 धावा आणि राहुल द्रविड 15,853 धावा आणि हाशिम अमलाने 15,185 धावा केल्या आहेत.

याचबरोबर विराटने एका विरूध्द संघाच्या विरूध्द सर्वाधिक शतकांच्या विक्रमाशी देखील बरोबरी केली आहे. विराटने वेस्ट इंडिजविरूध्द 9 शकते ठोकली आहेत तर सचिनने ऑस्ट्रेलियाविरूध्द 9 शतके ठोकली आहेत.

Leave a Comment