एका गुगल सर्चने महिलेचे बँक खाते झाले रिकामे


कोणतीही माहिती हवी असले तर आपण गुगल सर्च करत असतो. मात्र जर तुम्ही कस्टमर केअरचा नंबर सर्च करत असाल तर सावध व्हा. सध्या सर्च इंजिनवर खोटे कस्टमर नंबर वाढले आहेत. सर्च इंजनवर खोटे नंबर टाकणारे तुमच्या बँक अकाउंटची माहिती मागून तुम्हाला लुटू शकतात. गुगलवर सर्च करणे ही एक चुक तुम्हाला महागात पडू शकते.

अशीच एक घटना बैग्लोरच्या एक महिलेबरोबर घडली आहे. खोट्या कस्टमर केअर नंबरला कॉल केल्याने या महिलेचे बँक अकाउंट रिकामे झाले आहे. महिलेने फुड ऑर्डर रिफंड मिळवण्यासाठी खोट्या झोमॅटो कॉल सेंटरला कॉल केला. त्यानंतर तिला हा मोठा फटका बसला.

महिलेला झोमॅटो अँपवर कोणताच कस्टमर नंबर मिळाला नाही. त्यानंतर महिलेने गुगल सर्च करत कस्टमर नंबर डायल केला. येथे रिफंडसाठी बँकेची माहिती दिल्यानंतर काही मिनिटातच तिचे बँक अकाउंट रिकामे झाले.

फुड डिल्हिवरी अँप झोमॅटोकडून फेक कॉल सेंटर्स संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मागील महिन्यात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. असेच एक प्रकरण ईपीएफओ प्रोव्हिडंट फंडबद्दल समोर आले होते. जेथे चोरांनी मुंबईतील ईपीएफओ ऑफिसचा गुगलवरील नंबर बदलला होता. जेव्हा लोकांनी त्यावर कॉल केला तेव्हा त्यांची माहिती घेत त्यांना फसवण्यात आले.

Leave a Comment