असे हे टीम इंडियाच्या निळ्या जर्सीचे देशभक्ती कनेक्शन


15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी आपल्या देशाच्या संघाकडून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. स्वातंत्र्यापुर्वी खेळाडू राजा-महाराजा, युवराज हे ब्रिटिश अथवा राजवाड्यांकडून खेळत असे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947-48 ला भारतीय संघ पहिल्यांदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी क्रिकेट हे पाढंऱ्या कपड्यांमध्ये खेळले जात असे. 1992 च्या विश्वचषकापासून रंगीत कपड्यात क्रिकेट खेळण्यास सुरूवात झाली. तेव्हापासूनच भारतीय संघाच्या कपड्यांचा रंग हा निळा आहे.

तुम्हाला माहिती आहे का भारतीय संघ नेहमी निळ्या कपड्यांमध्येच का खेळतो ? मागील 44 वर्ष ‘मॅन इन ब्ल्यू’ च्या जर्सीचे डिझाईन, पँटर्न अनेक गोष्टी बदलल्या आहेत. एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे कपड्यांचा रंग.

भारतीय संघाची जर्सी ही तिरंग्याच्या एका रंगा पैकी एक रंग असू शकत होती. मात्र काही कारणास्तव निळा रंग देणे योग्य समजले गेले.

भगवा रंग हा भारतातील एक राजकीय पक्षाकडे इशारा करतो त्यामुळे तो रंग देण्यात आला नाही. तसेच कसोटी सामन्यात पांढऱ्या रंगाची जर्सी असल्याने तो रंग ही देण्यात आला नाही.

तसेच, भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तानच्या ध्वजाचा रंग हा हिरवा आहे. त्यामुळे संघाच्या जर्सीला हिरवा रंग देण्याचे टाळण्यात आले.

भारतीय ध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या अशोकचक्राचा रंग हा निळा आहे. याच कारणामुळे हा रंग देण्याचे निश्चित करण्यात आले व आजपर्यंत हा रंग कायम आहे.

Leave a Comment