अव्वाच्या सव्वा दर आकारणाऱ्या हॉटेल्सना बसणार चाप


नवी दिल्ली – नेहमीच विविध हॉटेल्स, रेस्टॉरन्टमधील पदार्थ खाण्यासाठी लज्जतदार खाण्याचे शौकीन असलेल्या व्यक्ती उत्सुक असतात. पण पदार्थांवर अव्वाच्या सव्वा दर काही हॉटेल्समध्ये आकारले जातात. पण आपण दिलेल्या पैशांऐवढी देखील त्या पदार्थाची चव सुद्धा नसते. खादाड व्यक्ती अशा वेळी या प्रकाराबद्दल नाराजगी व्यक्त करतो. पण आता ग्राहकांकडून पदार्थांवर लावण्यात येणारे अवाजवी दर हॉटेल मालकांना आकारता येणार नाही .

गेल्या काही दिवसांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमधून फक्त दोन केळी अभिनेता राहुल बोस याने खरेदी केली असता, त्यावर 500 रुपये आकारण्यात आले होते. त्यानंतर काहीच दिवसांनी चक्क दोन उकडलेल्या अंड्यांसाठी चक्क 1700 रुपये एका व्यक्तीला द्यावे लागल्याचा प्रकार समोर आला होता. यामुळे दंडभरपाई हॉटेलला द्यावी लागली होती. जर अशाच पद्धतीने ग्राहकांची लूट होत असल्यास त्यावर आता आळा बसणार आहे. कारण याबद्दलचा मु्द्दा केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी मांडला असून पदार्थांच्या अवाजवी दरावर चाप लावण्याच्या तयारीत आहेत.

हॉटेलचालकांकडून सेवाकरांच्या नावाखाली काही वेळेस ग्राहकांना लूटले जाते. काही लोक याच कारणास्तव हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी जाण्यास टाळतात. पण एखाद्या हॉटेलने आता ग्राहकाकडून खाद्यपदार्थांवर अवाजवी दर आकारल्यास त्याचे उत्तर मालकाला केंद्र सरकार आणि अन्न मंत्रालयाला द्यावे लागणार आहे.

Leave a Comment