दारु पिऊन ऑफिसमध्ये येणाऱ्या तळीरामांची आता खैर नाही


जर तुम्हाला दारू पिऊन अथवा नशा करून ऑफिसला जायची सवय असेल अथवा तुम्ही कधी कधी असे करत असाल तर तुम्ही ही सवय सुधरावयला हवी. कारण आता बाजारामध्ये असे सॉफ्टवेअर आले आहे जे, श्वासांच्या गतीवरून तुम्ही नशा केली आहे की, नाही ते सांगते. या खास सॉफ्टवेअरला चेन्नईमधील रैमको नावाच्या कंपनीने तयार केले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये रिकॉग्निशनबरोबरच ब्रीथ एनालायजरचा वापर देखील करते.

हे सॉफ्टवेअर ऑफिसच्या अटेंडेट सिस्टममध्ये लावण्यात येईल. त्यानंतर कर्मचारी अटेंडेट सिस्टममध्ये एंट्री करतानाच त्यांच्या चेहऱ्यांचे आणि श्वासांचे विश्लेषण केले जाईल आणि नशा केला असल्यावर एचआरला अलर्ट पाठवले जाईल.

सॉफ्टवेअर ब्रीथ एनालाइजरबद्दल 100 टक्के योग्य निर्णय देत असल्याचे कंपनीने दावा केला आहे. रैमकोचे आपल्या सॉफ्टवेअरबद्दल सांगितले की, हे सॉफ्टवेअर नशा करून ऑफिसला येणाऱ्यांना त्वरित ओळखेल. तर कंपनीचे सीईओ विरेंद्र अग्रवाल म्हणाले की, नशा करणाऱ्यांबरोबर ड्रग्स घेणाऱ्या लोकांची ओळख करण्यासाठी देखील सॉफ्टवेअर तयार करण्यात येत आहे.

Leave a Comment