कारवेड्या धोनीची कार्स २४ मध्ये गुंतवणूक


जीप ग्रँड चीरोकीचा भारतातील पहिला ग्राहक बनलेला टीम इंडियाचा माजी कप्तान धोनी याचे कार्स आणि बाईकचे वेड सर्वाना माहिती आहे. आता धोनी कार्सशी एका वेगळ्याच पद्धतीने जोडला गेला असून त्याने सेकंडहँड कार विक्री करणाऱ्या ऑनलाईन फर्म कार्स २४ मध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक नक्की कितीची आहे याचा खुलासा केला गेलेला नाही मात्र माही या कंपनीसाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणूनही काम करणार आहे.

धोनी सध्या काश्मीर मध्ये लष्करी सेवा करत आहे. कार्स २४ चे सहसंस्थापक आणि सीइओ विक्रम चोपडा म्हणाले, कंपनीसाठी धोनी ब्रँड अम्बॅसिडर बनला आहे आणि त्याबदली त्याला कंपनीचे शेअर दिले जाणार आहेत. धोनी सतत विकास, नवीन शोध आणि वर्षानुवर्षे येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यात माहीर आहे. आमची कंपनी याच मुल्यांवर काम करते त्यामुळे माहीसोबत भागीदारी ही योग्य आणि परिपूर्ण आहे.

२०१५ साली सुरु झालेल्या या कंपनीने देशातील सर्वात मोठा ऑनलाईन प्लॅटफॉर्म बनण्याची कामगिरी केली आहे. सध्या फ्रेन्चायझी बेस्ड व्यापार मॉडेल विकासावर कंपनी भर देत असून त्याद्वारे देशातील अधिकाधिक शहरांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सध्या कंपनीचचे २३० शहरात १० हजाराहून अधिक चॅनल पार्टनर्स आहेत. ३५ शहरात १५५ पेक्षा जादा शाखा कार्यरत आहेत.

Leave a Comment