माईक टायसन महिन्याला २८ लाखाच्या गांजाचा काढतोय धूर


माजी हेवीवेट चँपियन बॉक्सर माईक टायसन सध्या निवृत्ती घेऊन जीवनाचा उपभोग घेण्यात मग्न आहे. आपण दर महिन्याला ४० हजार डॉलर्स म्हणजे २८ लाख रुपये गांजावर उडवत असल्याचा खळबळजनक खुलासा त्याने नुकताच एका कार्यक्रमात बोलताना केला. त्याने खेळातून संन्यास घेतल्यानंतर पॉडकॉस्ट सुरु केले असून त्याचे नाव हिट बॉक्स इन आहे. यात त्याचा को होस्ट वकील इबेन ब्रिटन हे आहेत. या कार्यक्रमाच्या एका एपिसोड मध्ये बोलताना माईक टायसनने वरील खुलासा केला आहे.

वयाच्या विसाव्या वर्षी मुष्टीयुध्द हेविवेट चँपियन बनलेल्या टायसनने जगात खळबळ उडविली होती. इतकेच नव्हे तर त्याने एकाचवेळी डब्ल्यूबीए, डब्ल्यूबीसी आणि आयबीएफ हे खिताब जिंकून सर्वात तरुण हेवीवेट मुष्टियोद्धा हा लौकिक मिळविलेला आहे. खेळातून संन्यास घेतल्यानंतर आता तो आयुष्य मनमुराद जगत आहे.

कॅलिफोर्नियात त्याने एक शेत खरेदी केले असून या ४० एकर शेतात तो गांजा पिकवितो. हा व्यवसाय येथे कायदेशीर आहे. या शेताला त्याने द टायसन शेत असे नाव दिले असून येथे गांजापासून उत्तम प्रकारची उत्पादने बनविली जातात. त्यात त्याचा भागीदार वकील ब्रिटन हा आहे. या विक्रीतून त्यांना दर महिना ३५ लाख रुपये मिळतात. एके काळी टायसनला दिवाळखोर जाहीर केले गेले होते मात्र गांजा शेताने त्याचे भाग्य पुन्हा फळफळले आहे.

टायसन तर महिन्याला २८ लाखांचा गांजा फुंकतो या त्याच्या विधानाला अनेकांनी आव्हान दिले आहे. कारण एक माणूस इतका गांजा ओढत असेल दर दिवसाच्या प्रत्येक क्षण त्याने गांजा ओढायला हवा असे या लोकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment