नाना पाटेकर पूरग्रस्तांसाठी ५०० घरे बांधून देणार


महाराष्ट्रात पुराचा अतोनात फटका बसलेल्या सांगली, कोल्हापूर भागाला बुधवारी नाना पाटेकर यांनी भेट देऊन तेथील पूरग्रस्तांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि पुराने ज्यांची घरे हिरावून घेतली त्याच्या मदतीसाठी ५०० घरे बांधून देणार असल्याचे सांगितले.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना करून आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबांसाठी मदतीचा हात दिला आहे. आता पूर आलेल्या कोल्हापूर आणि सांगली भागाला भेट देऊन तेथील हवालदिल नागरिकांना त्यांनी धीर दिला आहे. या वेळी बोलताना ते म्हणाले, पुरासारख्या आपत्तीचा सामना करणे हे एकट्याचे काम नाही. त्यामुळे या संकटाला सर्वानीच तोंड दिले पाहिजे. एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले पण ते पुन्हा उभारण्यासाठी बराच वेळ लागणार आहे.

अश्या संकटात सरकारच्या मदतीलाही मर्यादा येतात हे लक्षात घेतले पाहिजे. ही आपत्ती फक्त सरकारची जबाबदारी नाही तर समाजातील सर्व लोकांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे. शिरोळ गावातील नागरिकांना दिलासा देताना ते म्हणाले, काळजी करू नका. एकदा डोक्यावर छप्पर आले कि बाकी सर्व सुरळीत होईल. यासाठी आम्ही ५०० घरे बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

बॉलीवूड मध्ये अनेक कलाकार पूरग्रस्तांच्या मदतीला आले असून रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी २५ लाख रुपयांचा मदतनिधी चेक नुकताच मुख्यमंत्री निधीला दिला आहे.

Leave a Comment