जुळ्यांच्या गावात जाताय मग हे नक्की वाचा


केरळ राज्याला गॉडस ओन कंट्री असे म्हटले जाते. निसर्गाचा वरदहस्त लाभलेले हे नितांतसुंदर राज्य विविध प्रकारच्या पर्यटनस्थळांनी नटलेले आहे. केरळचा मल्लापुराम जिल्हा त्याला अपवाद नाही. या जिल्हातील एक गाव जगाच्या नकाशावर अल्पावधीत चमकले आहे ते निराळ्याच कारणांनी. कोडीन्ही नावाच्या या गावाची ओळख जुळ्या मुलांचे गाव अशी झाले असून या गावात अनेक जुळी आहेत. देश विदेशातील प्रसिद्धी माध्यमात त्याची माहिती आल्यामुळे या गावात पर्यटक, पत्रकार, प्रसार माध्यमे यांची वर्दळ खूपच वाढली आहे.


केरळमध्ये जातोच आहोत तर या गावाला भेट देऊ असा विचार करत तुम्ही करत असला तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. या गावातील जुळ्या मुलांशी बोलण्याचा, त्यांचे फोटो काढण्याचा उद्योग करू नका. अर्थात त्यांची परवानगी घेऊन तुम्ही त्यांचे फोटो काढू शकाल. या मागचे कारण असे कि जुळ्यांचे गाव म्हणून ते आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशात आले आणि येथे फार मोठ्या संख्येने डॉक्युमेंटरी बनविणारे, लघुपट बनविणारे, पत्रकार येऊ लागले त्यामुळे या मुलांच्या जीवनात ढवळाढवळ केली जात आहे.

याचा त्रास या जुळ्यांना होऊ लागला असून रोजचे आयुष्य त्यांच्यासाठी अवघड बनत चालले आहे. परिणामी येथील ग्रामपंचायतीने त्या संदर्भात या मुलांशी कुणीही थेट संपर्क साधण्यास प्रतिबंध केला आहे. या गावापासून जवळ चेरूपत्तिमला नावचे एक सुंदर ठिकाण असून त्याला मिनी उटी म्हटले जाते. आसपास पाहण्यासारखी अनेक निसर्गसुंदर स्थळे आहेत.

Leave a Comment