गाडी सुरु करण्यासाठी या महिलेने लढवली आयडियाची कल्पना


हँकिंगबद्दल तर तुम्ही खूप ऐकले असेल मात्र कधी बायो हँकिंगबद्दल ऐकले आहे का ? काही दिवसांपुर्वी एका महिलेने सॉफ्टवेअर इंजिनिअरने बायो हँकिग करून पुर्ण जगाला हँकिगने आश्चर्यचकित केले आहे. महिलेने आपल्या हातात एक चिप इंस्टॉल केली होती. महिलेने आपल्या हातालाच टेस्ला कारची चावी बनवले होते.

रिपोर्टनुसार, महिला इंजिनिअरचे नाव एमी डीडी असून, ती गेम डेव्हलपर आणि प्रोग्रामर आहे. एम डीडीने बायो हँकिंगचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, महिलेने टेस्लाची कार मॉडल 3 च्या वॉलट कार्ड द्वारे चिप काढत आपल्या हातात इंस्टॉल केली. यासाठी तिने प्रोफेशनल बॉडी मॉडिफिकेशन्सची मदत घेतली.

एमी डीडीने पहिल्यांदाच बायो हँकिग केलेले नाही. याआधी देखील तिने आपल्या दुसऱ्या हातात घराचा दरवाजा उघडण्यासाठी एक्सेस कंट्रोल चिप लावली होती. याची माहिती स्वतः महिलने आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे. या चिपद्वारे महिला हातानेच आपल्या घराचा दरवाजा उघडू शकते.

हातामध्ये चिप इंस्टॉल करण्यामागे उद्देष होता की, हाताद्वारे कार स्टार्ट करता येईल. तिने हे देखील सांगितले की, ती टेस्लाच्या बग बाउंटी प्रोग्राममध्ये देखील सहभागी आहे. टेस्ला एमीला यासाठी बक्षीस स्वरूपात रक्कम देखील देईल. हातामध्ये चिप इंस्टॉल केल्यानंतर एमी सहज आपली टेस्ला कार स्टार्ट करू शकते. आता तिला चावी स्वताबरोबर बाळगण्याची अजिबात गरज नाही.

Leave a Comment