या व्यक्तीला आहे भारतात सर्वाधिक पगार


आजच्या महागाईच्या काळात सर्वच कर्मचारी वर्ग हा पगार कमी आहे अशी तक्रार करत असतो. एकतर कामाप्रमाणे पगार मिळत नाही अथवा योग्य कामच मिळत नाही. अशी परिस्थिती प्रत्येकाच्या बाबतीतच असते. कमी पगार आणि नोकरीची असुरक्षितता या दोन गोष्टी खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला वाटत असतात. पण आजच्या काळात देखील काही लोक अशी आहेत, जे केवळ पगाराच्या जोरावर करोडपती झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जो केवळ आपल्या पगारावर करोडपती झाला आहे.

मुरली के दिवी या व्यक्तीला 2018-19 या आर्थिक वर्षात तब्बल 58.80 करोड रूपये पगार मिळाला आहे. यामध्ये त्यांचा पगार आणि कमिशनचा समावेश आहे. मुरली हे भारतातील फार्मा कंपन्यांमध्ये सर्वाधिक पगार घेणारे कर्मचारी आहेत. पगाराच्या व्यतरिक्त त्यांनी 57.61 करोड रूपये कमिशनमार्फत मिळवले आहेत. याचबरोबर द डिव्हिजन लँब्रोटरीने आपल्या कंपनीचे कार्यकारी संचालक एनवी रमन यांना 30 करोड रूपये आणि मुरली दिवी यांचा मुलगा आणि संचालक किरण दिवीला 20 करोड रूपये पगार मिळाला आहे.

कंपनीच्या रिपोर्टनुसार, मुरली दिवी यांना मागील वर्षाच्या तुलनेत 46.30 टक्के अधिक पगार मिळाला आहे. मुरली यांना 2017-18 या आर्थिक वर्षात 40.20 करोड रूपये पगार मिळाला होता. यामध्ये 39 करोड रूपये कमिशनचा समावेश होता. कंपनीचे 2018-19 या आर्थिक वर्षातील महसूल 5,036 करोड असून, कर भरून कंपनीचे नेट प्रॉफीट 1,333 करोड एवढे आहे.

Leave a Comment