आयफोनचा डेटा चोरण्यासाठी हॅकर्सने शोधली नवी पद्धत


तुम्ही जर आयफोन युजर्स असाल व नवीन चार्जिंग केबल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सावध व्हा. एमजी नावाच्या हॅकर्सनुसार, आयफोनच्या चार्जिंग केबलद्वारे तुमचा खाजगी डाटा चोरी केला जात आहे.

मदरबोर्डच्या रिपोर्टनुसार, याला अ‍ॅपलच्या केबलमध्ये बदल करून तयार करण्यात आले असून, जे अ‍ॅपलच्या सर्वसाधारण केबल प्रमाणेच दिसते. केबलला स्मार्टफोनला जोडताच हॅकर्स डिव्हाईसच्या आजुबाजूला असलेल्या वाय-फाय नेटवर्कद्वारे स्मार्टफोनमध्ये दुषित सॉफ्टवेअर पाठवतात. रिपोर्टनुसार, या चार्जिंग केबलमध्ये अनेक प्रकारचे पैलोड्स, स्क्रिप्ट आणि कमांड्स आहेत. यांना हॅकर्स युजर्सच्या डिव्हाईसमध्ये सुरू करतो. हॅकर्स युएसबीमध्ये करण्यात आलेले बदल सर्व काढून टाकतो, जेणेकरून पुढे देखील डाटा चोरी करता येईल. युजर्सच केबल डिव्हाईसमध्ये लावल्यानंतर हँकर स्क्रिन काहीवेळासाठी लॉक करतात. युजर्सने पुन्हा पासवर्ड टाकताच, हँकर्स सर्व माहिती जमा करतो.

एमजी नावाच्या हॅकर्सने सांगितले की, ही केबल एका विशिष्ट प्रकारच्या क्रॉस प्लँटफार्म अटँक पैलोड्सचे काम करते. युजर्सला माहिती असते की, प्लँश ड्राईव्हचा वापर करणे योग्य नाही. मात्र त्यांना हे माहित नसते की, याद्वारे डाटा देखील चोरी केला जाऊ शकतो. एमजीने ही कँबल स्वतः तयार केली आहे. या अ‍ॅपल केबलमध्ये बदल करून तयार करण्यात आले आहे.

Leave a Comment