गर्लफ्रेंडला सहन होईना ऋषभशी विरह !


सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडिया असून या दौऱ्यातील टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश देत मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. ऋषभ पंतच्या या सामन्यातील फलंदाजीवरून त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

View this post on Instagram

3:0 🇮🇳 🙌🏻

A post shared by Rishabh Pant (@rishabpant) on


विश्रांती घेण्याचा निर्णय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने घेतल्यानंतर ऋषभ पंतची संघात वर्णी लागली. दरम्यान पावसामुळे पहिला एकदिवसीय सामना रद्द झाल्यामुळे हॉटेलमध्येच खेळाडूंना सराव करावा लागला. ऋषभने त्याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.


कुलदीप या व्हिडिओमध्ये पंतला गोलंदाजी करत आहे, तर किपिंगचा अभ्यास पंत करत आहे. हा व्हिडिओ ऋषभ पंतने शेअर केल्यानंतर त्याची गर्लफ्रेण्ड इशा नेगीने मिस यू, अशी कमेंट या व्हिडिओवर केली.


ऋषभ पंतने याआधी इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करताना, तुला मला फक्त आनंदी ठेवायचे आहे. तुच माझ्या आनंदाचं कारण असल्याचे कॅप्शन लिहित दोघांचा फोटो टाकला होता.

तर, इशानं शेअर केलेल्या फोटोत, माझा जीवनसाथी, माझा बेस्ट फ्रेंड, माझे प्रेम असे म्हटले होते. ऋषभ पंतने ईशाने पोस्ट केलेल्या फोटोवर लव्ह यू अशी कमेंटही केली होती.

ईशा नेगी ही व्यवसायाने इंटेरिअर डिझायनर असून ऋषभ पंत आणि ईशाच्या प्रेमाबद्दल समजताच त्यांच्या फॉलोअर्समध्येही वाढ झाली. त्यामुळे आता दोघांनी लवकर लग्न करावे असा सल्लाही चाहत्यांनी दिला आहे. तर काही चाहत्यांनी काही चाहत्यांनी ऋषभला खेळावर लक्ष देण्यासही सांगितले आहे.

Leave a Comment