सर्वात लांब नदी पार केली या पठ्ठ्याने


ब्रिटनचे ऐश डाइक्स हा जगातील तिसरी सर्वात लांब नदी यांगत्जेचा साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास करणारे पहिले व्यक्ती ठरले आहे. 28 वर्षीय ऐशने एक वर्षांचा हा प्रवास करताना -20 डिग्री सेल्सियस तापमानाचा देखील सामना करत अखेर सोमवारी हा प्रवास पुर्ण केला. या प्रवासात त्यांला लांडगा, अस्वाल आणि जंगली कुत्रे यांचा सामना करावा लागला. तिब्बतच्या पर्वतांमधून निघणारी यांगत्जे नदी चीनच्या 11 राज्यातून जात पुर्व चीनच्या समुद्राला मिळते.

या प्रवास ऐशला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या प्रवासावर निघण्याआधी त्याने दोन वर्षांची ट्रेनिंग घेतली होती. यादरम्यान त्याने न केवळ मेंडरियन भाषा शिकली तर चीनच्या रस्त्यांचा देखील अभ्यास केला.

शंघाईमधील फिनिशिंग लाइन पुर्ण केल्यावर ऐश म्हणाला की, हे खरचं अविश्वसनीय आहे. मला यावर विश्वास बसत नाही. कारम ही योजना बनवण्यासाठी मला दोन वर्ष लागली. पुर्ण एक वर्ष हा प्रवास करण्यात गेले. मात्र हे खरचं खास आहे. याने इतिसास बनला.

त्याने सांगितले की, माझ्यासाठी सर्वाधिक कठिण माउंट एवरेस्टच्या बेस कँम्प एवढ्या उंचीवर असणाऱ्या नदीच्या स्त्रोतापर्यंत पोहचणे हे होते. मला जेवढे अवघड वाटत होते, ते त्या पेक्षा अधिक कठिण होते. माझ्या टीममधील चार जणांनी तर प्रवास सुरू होण्याआधीच सोडला होता. मला अनेकवेळा असे वाटले की, मी हा प्रवास का करत आहे.

ऐश सांगतो की, हा प्रवास अवघड तर होताच पण सांस्कृतिक दृष्ट्या देखील चीनी संस्कृतीबद्दल खुप काही शिकायला मिळाले. ऐश आता चीनी मीडियासाठी एक ओळखीचा चेहरा झाला आहे.

MISSION ACCOMPLISHED!!!History created!!!4,000 miles.352 daysToday, I became the first person to walk the entire length of the Yangtze River!! #MissionYangtze#MissionPossible

Posted by Ash Dykes on Monday, August 12, 2019

सोशल मीडियावर त्याला 10 लाखांपेक्षा अधिक लोक फॉलो करतात. त्यांनी आपल्या या लोकप्रियतेचा फायदा लोकांना पर्यावरणाप्रती जागृक करण्यासाठी केला. यादरम्यान त्याने सांगितले की, एका वर्षाच्या या प्रवासात माझे ज्ञान खुप वाढले. मी वेगवेगळ्या समुदायांच्या अडचणी समजू शकत आहे. लोकांना भेटल्यावर मला समजले की, पाण्याच्या स्त्रोतांना होणाऱ्या नुकसानाबद्दल त्यांनाही माहिती असून, ते देखील यासाठी काम करत आहेत.

Leave a Comment