जाणून घ्या राष्ट्रगीताविषयी काही रोचक तथ्य


‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र राष्ट्रगीत बनवण्यामागचे सत्य खूप कमी जणांना माहिती असेल. हे एक गीत भारताची विविधता, परंपरा व त्याचबरोबर एकतेला देखील दर्शवते. राष्ट्रगीत हे देशाची शान आहे. आज आम्ही तुम्हाला राष्ट्रगीताविषयी अशीच रोचक माहिती सांगणार आहोत.

कोणत्या गाण्याला राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळतो ?
– कोणत्याही गीताला राष्ट्र गीताचा दर्जा देण्यासाठी कायदा करावा लागतो. जो पर्यंत सरकारद्वारे तो अधिनियम पास केला जात नाही तो पर्यंत त्या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळत नाही.

‘जन गण मन’ राष्ट्रगीताचा दर्जा कधी दिला ?
– संविधान सभेद्वारे ‘जन गण मन’ च्या हिंदी आवृत्तीला राष्ट्रगीताच्या स्वरूपात 24 जानेवारी 1950 रोजी स्विकारण्यात आले.

कोणत्या भाषेत लिहिले गेले होते ‘जन गण मन’ ?
– रविंद्रनाथ टागौर यांनी बंगाली भाषेत हे गीत लिहिले होते.

‘जन गण मन’ गीताचा कालावधी ?
– राष्ट्रगीत गाण्यासाठी 52 सेंकदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

काही रोचक माहिती –

  • 1911 पर्यंत भारताची राजधानी ही कोलकत्ता होती.
  • बंगालच्या फाळणी दरम्यान बंग-भंग आंदोलनाला सर्वसामान्य जनतेद्वारे होणारा विरोध बघून ब्रिटिशांनी भारताची राजधानी कोलकत्ता बदलून दिल्ली केली.
  • ‘जन गण मन’ या गीताचा जन्म कोलकत्तामध्ये झाला आहे.
  • कवी रविंद्रनाथ टागोर यांनी हे गीत बंगालीमध्ये लिहिले होते.
  • 27 डिसेंबर 1911 ला कोलकत्तामध्ये झालेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या वार्षिक सम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी गाण्यात आले होते.
  • या गीताला आवाज रविंद्रनाथ टागोर यांची भाजी सरला देवी चौधरी यांनी आवाज दिला होता. त्यांनी हे गीत एका शाळेच्या कार्यक्रमात गायले होते.
  • सध्या असलेला राष्ट्रगीताचे सुर हे आंध्रप्रदेशातील मदनपिल्लै या छोट्याशा जिल्ह्यातून घेण्यात आले आहेत.
  • प्रसिध्द कवी जेम्स काजिन यांच्या पत्नी मारग्रेटने या गीताचा इंग्रजी अनुवाद केला आहे.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी हे गीत बंगालीमधून हिंदीत अनुवाद करून घेतले होते.
  • राष्ट्रगीताचे हिंदी अनुवाद कँप्टन आबिद अली यांनी केला आहे.
  • राष्ट्रगीताला संगीत कँप्टन राम सिंह यांनी दिले होते.
  • जर एखादी व्यक्ती राष्ट्रगीताच्या नियमांचे पालन करत नसेल तर अथवा त्याचा अपमान करत असेल तर त्याला Prevention of Insults to National Honour Act, 1971 च्या कलम -3 च्या अंतर्गत कडक शिक्षा होऊ शकते.

Leave a Comment