एकेकाळी कचरा वेचायचा भारतातील हा प्रसिध्द फोटोग्राफर


प्रत्येक व्यक्तीचा एक प्रवास असतो. त्या प्रवासात अनेक अडथळे येत असतात. काही जण या अडथळ्यांमुळे प्रवास मधेच सोडून देतात तर काहीजण ते अडथळे पार करत, न डगमगता पुढे जात राहतात आणि पुढे जात अशा उंचीवर जाऊन पोहचात जेथून ते पुन्हा कधीच मागे वळून पाहत नाही. अशीच एक प्रेरणादायी कहानी आहे विक्की रॉयची. एकेकाळी कचरा वेचून आयुष्य जगणारा विक्की आज भारतातील एक प्रसिध्द फोटोग्राफर आहे.

रस्त्यावर कचरा वेचणारा ते फोर्ब्स आशियाच्या 30 अंडर 30 मध्ये समावेश होणाऱ्या या फोटोग्राफरचा प्रवास सध्या सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरत आहे. फेसबुकवरील प्रसिध्द पेज ह्युमन्स ऑफ बॉम्बे ला विक्की रॉयने आपल्या प्रवासातील अनुभव शेअर केले. विक्कीचे हे अनुभव अनेकांच्या ह्रदयाला स्पर्शुन गेले आहेत.

आपले अनुभव शेअर करताना विक्कीने सांगितले की, ‘एक चांगले आयुष्य जगण्यासाठी त्याने 11 वर्षांचा असतानाच घर सोडत दिल्ली गाठली. दिल्लीला आल्यावर त्याला जगण्यासाठी त्याने कचरा वेचला. ट्रेनमध्ये पाण्याच्या बॉटल्स विकल्या तर कधीकधी मोकळ्या मैदानावर देखील रात्र काढली. ‘एका धाब्यावर त्याने भांडी घासण्याचे काम देखील केले तर पोट भरण्यासाठी त्याला शिल्लक राहिलेले अन्न खावे लागत होते.’

विक्कीने सांगितले की, ‘हा प्रवास एका डॉक्टरने मला सलाम बालक या एनजीओकडे नेई पर्यंत सुरू होता. तिथे गेल्यावर आयुष्य बदलून गेले. मला घालायला कपडे भेटले. तीन वेळा जेवायला मिळत होते आणि विशेष म्हणजे झोपायला छत होते. त्यांनीच मला शाळेत देखील पाठवल्याचे विक्कीने सांगितले.’

त्याच काळात एक ब्रिटिश फोटोग्राफरने त्यांना भेट दिली होती. विक्की त्याच्या कामाने फारच प्रभावित झाला.

विक्कीने सांगितले की, ‘मला त्याचे काम खूपच आवडले. रस्त्यावरती आयुष्य जगत असताना मी मनुष्याचे अनेक पैलू बघितले होते जे मी यापुर्वी कधीच अनुभवले नव्हते. मला त्यांच्याप्रमाणे हे सर्व फोटोच्या मार्फत दाखवयचे होते.

18 वर्षांचा असताना एनजीओने 499 रूपयांचा कँमेरा घेऊन दिला व एका फोटोग्राफरकडे इंटर्नशिप देखील मिळवून दिली. तेथून पुढे मी कधीच मागे वळून पाहिले नाही.’

विक्कीच्या फोटोंचे सोलो एक्झिबेशन भरवण्यास त्या फोटोग्राफरने मदत केली. त्या फोटोंचे नाव स्ट्रीट ड्रीम्स असे होते. त्याने सांगितले की, लोक माझे फोटो खरेदी करत होते. मी जगभर प्रवास करत होतो. मला न्युयॉर्क, लंडन, साउथ अफ्रिका आणि सँन फ्रँन्सिस्कोवरून देखील निमंत्रण आले.

विक्की सांगतो, मी माझे नशीब या पध्दतीने बदलू शकेल असे मला कधीच वाटले नव्हते. विक्कीला 2014 मध्ये एमआयटीची मीडिया फेलोशीप देखील मिळाली. तसेच 2016 च्या फोर्ब्स आशिया मँगझिनच्या 30 अंडर 30 मध्ये देखील त्याचा समावेश होता.

“When I was 3, my parents left me with my grandfather, but he’d often beat me up. I used to hear about people leaving…

Posted by Humans of Bombay on Monday, August 12, 2019

विक्कीचे अनुभव असलेली ही पोस्ट शेअर केल्यानंतर आतापर्यंत 12 हजार लाईक्स आणि शेकडो कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

अनेकांनी त्याचा प्रवास प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे तर काहींनी अंधारानंतर प्रकाश येतोच असे म्हटले आहे. तर काहींनी त्याच्या या प्रवासाबद्दल खूप आनंदी असल्याचे कमेंट्समध्ये म्हटले आहे.

Leave a Comment