भारताबरोबर या तीन देशात देखील साजरा केला जातो स्वातंत्र्य दिन


आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 15 ऑगस्ट रोजी संपुर्ण भारतात स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. अनेक परकिय सत्तांशी लढत, ब्रिटिशांशी लढत अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी आपले प्राण अर्पण करत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वातंत्रता मिळवण्याची प्रत्येक देशाची एक वेगळी कहानी आहे. 15 ऑगस्ट रोजी भारताबरोबर अन्य तीन देशात देखील स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. जाणून घेऊया त्या तीन देशांबद्दल.

1. कांगो
अफ्रिका खंडाती तिसरा सर्वाधिक मोठा देश कांगो आहे. 15 ऑगस्ट 1960 ला कांगोला फ्रांसकडून स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फुल्बर्ट युलौ यांचे 1963 पर्यंत राष्ट्रपती शासन होते.

2.कोरिया
15 ऑगस्ट 1945 ला उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाला जापानकडून स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1945 ला हा देश डेमोक्रेटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया झाला.

3. लिकटेंस्टीन
लिकटेंस्टीन हा जगातील सर्वाधिक छोट्या देशांपैकी एक आहे. 1866 मध्ये या देशाने जर्मनीशी लढत स्वातंत्र्य मिळवले होते. 15 ऑगस्ट 1940 पासून ते राष्ट्रीय दिवस साजरा करतात. या दिवशी राजकुमाराच्या महालात कँथोलिक लोकांना मोफत एक पेय आणि सँडविच दिले जाते, जेणेकरून त्यांना चर्चा करता येईल.

Leave a Comment