अजय-अतुलचा ‘कौन बनेगा करोडपती’ला स्पेशल तडका


पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला टीव्हीवरील सुपरहिट आणि लोकप्रिय शो ‘कौन बनेगा करोडपती’ येणार आहे. बॉलीवूडचे शहेनशाहा अर्थात अमिताभ बच्चन यांच्या खांद्यावर या शोच्या सूत्रसंचालनाची धूरा असते. किंबहुना, हा शो त्यांनी एवढ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे की हॉट सीटवर त्यांच्याशिवाय दुसरे कोणी बसले आहे, अशी कल्पना सध्या तरी त्यांच्या चाहत्यांना करणे अशक्य आहे. काही बदल ‘कौन बनेगा करोडपती’ पर्व ११च्या थिम साँगमध्ये करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मराठ मोळी जोडी अजय-अतुल यांनी हे थिम साँग रिक्रीएट केले आहे.

‘कौन बनेगा करोडपती’चे थिम साँग रिक्रिएट करतानचा अजय आणि अतुल यांचा व्हिडीओ समोर आला आहे. आमच्या जीवनातील हा सर्वात मोठा क्षण असून मूळ गाण्यात बदल न करता हे गाणे आम्हाला प्रेक्षकांच्या समोर आणायचे होते. आम्ही या गाण्यासाठी सर्वांत जास्त वाद्य वापरली आहेत. आमच्या आयुष्यातले हे पहिले गाणे आहे ज्यामध्ये आम्ही सर्व वाद्यांचा वापर केला आहे. एकशे दहाहून अधिक संगीतकारांचा या थिम साँगमध्ये सहभाग आहे. हे थिम साँग रिक्रिएट करणे आमच्यासाठी आव्हानात्मक असल्याचे अजय आणि अतुल यांनी व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment