भूतान नरेशांची सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली


भारत सरकारच्या माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांना भूतानचे नरेश जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी अनोखी श्रद्धांजली दिली आहे. भूतान नरेशांनी सुषमा यांच्यासाठी मठात प्रार्थना सभा आयोजित केली आणि तेथे सुषमा यांच्या फोटोसमोर तुपाचे १००० दिवे लावून त्यांना श्रद्धांजली दिली. गुरुवारी ही प्रार्थना सभा झाली. त्यांनी सुषमा यांचे कुटुंबीय आणि भारत सरकारला शोक संदेशही पाठविला आहे.

भूतानचे पंतप्रधान लोटे शेरिंग यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात ते म्हणतात, सुषमा यांचे निधन फक्त भाजप किंवा भारतासाठी नाही तर भूतान साठी मोठे नुकसान आहे. भूतान आणि भारत या दोन देशातील संबंध अधिक दृढ बनविण्यात सुषमा यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्या आमच्या देशाच्या सच्च्या दोस्त होत्या. गतवर्षी भारत भेटीवर आलो तेव्हा त्याची भेट झाली होती. त्यांची आठवण आम्हाला नेहमीच येत राहील.

Leave a Comment