दुर्लभ आजारानेच तिला बनविले टॉप मॉडेल


जाहिरात क्षेत्रात मॉडेल म्हणून झळकायचे असेल तर देखणेपणा हवा आणि त्याचबरोबर मेकअपचे सहाय्य हवे हे खरे असले तरी अमेरिकेतील एका टॉप मॉडेल साठी तिचा दुर्लभ आजार हेच मुख्य माध्यम बनले आहे. मेलानी गेडोस असे तिचे नाव असून तिला जेनेटिक डीसऑर्डरमुळे केस, नखे नाहीत. त्यामुळे ती एखाद्या पुतळ्यासारखी दिसते.

मेलेनीचा ओठ आणि टाळू जन्मजात दुभंगलेले आहेत. या जेनेटिक डीसऑर्डरमुळे दात, केस, नखे, त्वचा, हाडे आणि शरीरातील ग्रंथींच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. मेलानीचे डोळे आणि कान पुरेसे विकसित झालेले नाहीत. तिच्यावर आत्तापर्यंत ४० शस्त्रक्रिया झाल्या आहेत. आणि या सर्व व्याधीवर मात करून ती न्यूयॉर्क मधली यशस्वी मॉडेल बनली आहे. तिने शिक्षण सुरु असताना तिचा एक फोटो सोशल मिडीयावर टाकला होता आणि तो पाहून तिला मॉडेलिंगची ऑफर आली. गेली आठ वर्षे ती हे काम करते आहे. मेलानीच्या जनुक दोषाला एक्टोडर्मल डिस्प्लेक्शिया असे म्हटले जाते.

Leave a Comment