रुग्णांसाठी देव बनला माजी सैनिकाचा दिव्यांग मुलगा


देशाची सेवा करताना सैन्यातच भर्ती व्हावे असे काही नाही. तुम्ही जेथे आहात, ज्या स्थितीत आहात तेथून देखील तुम्ही देशाची सेवा करू शकता. मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर येथे राहणाऱ्या डॉ. विक्रम सिंह यांची अशीच एक प्रेरणादायी कहानी आहे. हात-पाय काम करत नसताना देखील वैद्यकिय सेवेला ते देश सेवा समजतात आणि गरीबांची सेवा करण्याला धर्म मानतात.

डॉ. विक्रम मागील सहा वर्षांपासून ग्वाल्हेर मधील दोन सिविल हॉस्पिटल व्यवस्थित संभाळत आहेत. त्याचबरोबर गरीब आणि असाह्य व्यक्तींच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात. डॉ. विक्रम सिंह यांचे वडिल केके सिंह सैन्यात कँप्टन होते व त्यांच्याकडून त्यांना प्रेरणा मिळाली.

दोन्ही पायांनी 10 दहावीत असतानात काम करणे बंद केले होते. त्याच परिस्थितीत एमबीबीएसचे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर हातांनी देखील काम करणे सोडून दिले. आता ते चालू-फिरू शकत नाहीत. मात्र सेवा करण्यासाठी ते आजही तत्पर असतात.

36 वर्षीय डॉ. विक्रम यांची कारच त्यांचा दवाखाना आहे. कार बघताच रूग्ण त्यांच्या अवतीभोवती जमा होतात आणि ते कारमध्येच रूग्णांचा उपचार करतात. ते यासाठी कोणतेही शुल्लक आकारत नाहीत. गरज पडली तर रूग्णांच्या औषधांचा खर्च देखील देतात.

डॉ. विक्रम सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत एका हॉस्पिटल बाहेर गाडी लावून तेथेच रूग्णांवर उपचार करतात. संध्याकाळनंतर ते घरी अथवा आजुबाजूच्या वस्तीवर गरज असेल त्यांचा उपचार करतात.

विक्रम सिंह सांगतात की, केवळ हेतू पक्के असला पाहिजे. देशाची सेवा कोठेही व कशाही स्थितीत करता येते. जेव्हा माझ्या शरीराच्या एका भागाने काम करने बंद केले तेव्हा माझ्या ह्रदयाने आणि मेंदूने अधिक काम करण्यास सुरूवात केली. मला जेव्हा कोणी आजारी दिसते तेव्हा त्यांना त्वरित ठिक करण्याचे मन करते. मी कोणाला लाचार परिस्थितीमध्ये बघू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी उपचार करण्यास सुरू करतो. जी मदत माझ्याकडून होऊ शकते ती करतो. हीच माझ्यासाठी देश सेवा आहे.

विक्रमची आई मधु कुशवाह स्कूल टिचर आहेत. ते सांगतात की, तो चालायचा, फिरायचा.  जेव्हा 15 वर्षांचा झाला तेव्हा त्याच्या पायाला त्रास होऊ लागला व तेव्हापासून एक पाय काम करणे बंद झाले.

जेव्हा त्याची निवड मेडिलकल एंट्रेससाठी झाली तेव्हा वाटले सर्वकाही व्यवस्थित होईल. मात्र आज त्याची ही हालत बघून मला खूप त्रास होतो. 2007 मध्ये ऑपरेशन झाले तेव्हा सर्व व्यवस्थित झाले.  2011 मध्ये त्याचे लग्न वाराणसीच्या ऋतु सिंह बरोबर करण्यात आले.

लग्नानंतर पुन्हा पायाला त्रास होऊ लागला. तीन वर्षांआधी पायाबरोबरच हातांनी देखील काम करणे बंद केले. जे इम्प्लांट करण्यात आले होते त्याची क्वालिटी खराब होती.

रूग्ण देव मानतात –

रूग्ण रामसिंह कुशवाह सांगतात की, डॉक्टर साहेबांना कोठे आजारी व्यक्ती दिसतो. रस्त्यावर चालताना देखील त्यांना इशारा केला तर ते थांबतात. त्यांनी कोणत्याच रूग्णाला परत पाठवले नाही. एवढा त्रास होत असताना देखील ते मदत करतात. मी अनेक वेळा रस्त्यावर गाडी थांबवत उपचार घेतले आहेत. त्यांनी कधीही नाही म्हटले नाही.

ग्वाल्हेरचे सीएमएचओ डॉ. मृदूल सक्सेना सांगतात की, डॉ. विक्रम दिव्यांग नाही तर दिव्यांग तर ते लोक आहेत जे हात-पाय असताना देखील काम करत नाहीत. विक्रम यांच्यात देशभक्ती आणि जनसेवाचा भाव दिसून येतो. दोन हॉस्पिटल्सची जबाबदारी ते एकटे संभाळतात. ते आमच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

Leave a Comment