गुगल सर्चमध्ये सनीबाई अव्वल


बॉलीवूडची बेबी डॉल अर्थात सनी लिओनने पुन्हा एकदा कमाल केली आहे. सनी लिओन ऑगस्ट 2019 च्या गुगल सर्च सर्व्हेमध्ये अव्वल ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खानलाही तिने मागे टाकले आहे. या सर्वांच्या तुलनेत सनी लिओन गुगल सर्चमध्ये पुढे आहे. गुगल ट्रेन्ड अॅनालिटिक्सनुसार सनी लिओने आणि तिचे व्हिडीओ गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जातात.

मणिपूर आणि आसाम राज्यात सनी लिओनला सर्वाधिक सर्च केले आहे. सनी लिओन गुगल सर्चमध्ये अव्वल ठरल्यामुळे तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग असल्याचे सिद्ध झाले आहे. बॉलिवूमडमधील मोठे स्टार सलमान आणि शाहरुख खानलाही यंदा मागे टाकत तिने गुगल सर्चमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना सनी म्हणते, माझ्या सर्व चाहत्यांचे मी खूप आभार व्यक्त करते. ते मला नेहमी साथ देतात त्यामुळे मला खूप छान वाटते. सनी लिओनने गेल्यावर्षीही गुगल सर्चमध्ये पहिले स्थान मिळवले होते. सनी लिओनने नुकतेच दोन लहान मुलांना दत्तक घेतले आहे. याशिवाय तिच्या जीवनावर आधारित एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.