पाकिस्तानी उच्चायुक्तांनी केलेल्या आरोपाचे शोभा डे यांनी केले खंडन


लेखिका शोभा डे ने माजी पाकिस्तानी उच्चयुक्त अब्दुल बासित यांनी केलेल्या दाव्याचे खंडन केले आहे. अब्दुल बासित यांनी दावा केला होता की, हिज्बुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुरहान वाणीला जुलै 2016 मध्ये मारण्यात आल्यानंतर प्रदर्शन करणाऱ्यांवर पँलेट गनचा वापर करण्यात आला होता. यासर्वांवर पत्रकारांनी लिहिले नव्हते. काश्मीरबद्दल भारताविरूध्द लिहिण्यास शोभा डे तयार झाल्या होत्या व त्यांनी आपल्या एका स्तंभामध्ये ‘काश्मीर मुद्याला जनमताद्वारे कायमचे सोडवले गेले पाहिजे’, असे लिहिले होते. पाकिस्तानच्या सांगण्यावरून त्यांनी हा लेख लिहिला असल्याचं देखील बासित म्हणाले.

बासित यांच्या या दाव्याला उत्तर देताना, शोभा डे यांनी याचे खंडन केले आहे. डे म्हणाल्या की, ‘बासित यांना मी केवळ जानेवारी 2019 मध्ये जयपूर लिटरेचर फेस्टिवलच्या दरम्यान केवळ एकदाच भेटली आहे. त्यावेळीच आमची पब्लिशिंग पार्टीमध्ये भेट झाली होती व आमच्यात तेवढेच बोलणे झाले होते.’

डे म्हणाल्या की, ‘त्यावेळी त्यांनी अनेक विषयांवर चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्याही वेळी ते चीनच्या प्रश्नावर बोलत होते. त्या माणसाबरोबर हीच पहिली व शेवटची भेट होती.’

शोभा डे म्हणाले की, ‘सत्यावर विश्वास ठेवणाऱ्या कोणालाही हे धोकादायक, दुर्भावनायुक्त आणि अन्यायकारक वाटेल. गेली 40 वर्षांपासून हिम्मतीने आणि विश्वासार्ह्यतेने पत्रकारिता करणाऱ्या एखाद्या व्यक्तीवर असे आरोप करणे दुखःद आणि अपमानकारक आहे.’

Leave a Comment