ग्रॅच्युएटीविषयी जाणून घ्या संपुर्ण माहिती


जेव्हा एखादा कर्मचारी कोणत्याही कंपनीत कमीत कमी 5 वर्ष काम करतो तेव्हा त्याला कंपनीतर्फे एक ठरावीक रक्कम दिली जाते, त्याला ग्रॅच्युएटी असे म्हणतात. आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटी देणे हे केवळ कंपनीचे कर्तव्यच नाही तर त्यांना कायद्याने बंधनकारक देखील आहे. पेमेंट ऑफ ग्रॅच्युएटी अँक्ट, 1972 च्या अंतर्गत ग्रॅच्युएटीचा फायदा कंपनीची सदस्य संख्या 10 पेक्षा जास्त असल्यावरच मिळते. कर्मचाऱ्याने नोकरी सोडल्यानंतर, निवृत्ती घेतली अथवा अपघातात आजारी अथवा अंपग झाल्यावर कंपनी द्वारा ग्रॅच्युएटी दिली जाते. यासाठी एकमेव अट म्हणजे कर्मचाऱ्याने पाच वर्ष कंपनीत काम केलेले असावे. कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर देखील ग्रॅच्युएटी देण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये 5 वर्ष काम करण्याची अट लागू नसते.

अशी होते ग्रॅच्युएटीची मोजणी –
ग्रॅच्युएटीची रक्कम आणि यावर लावण्यात येणारा आयकरचे मोजमाप वेगवेगळ्या नियमांच्या आधारावर केले जाते. ग्रॅच्युएटी अँक्टच्या अंतर्गत येणारे कर्मचारी, त्याच्या अंतर्गत न येणारे कर्मचारी आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी वेगवेगळे नियम आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षांच्या सेवेसाठी मागील सेलरीच्या (बेसिक सेलरी+महागाई भत्ता+कमीशन) 15 दिवसांची रक्कम ग्रॅच्युएटी म्हणून देण्यात येते. जर एखादा कर्मचारी आपल्या सर्विसपेक्षा सहा महिने अधिक काम करत असेल तर त्याची ग्रॅच्युएटी ही पुर्ण वर्षाची मोजली जाते. समजा, एखाद्या कर्मचाऱ्याने कपंनीमध्ये 5 वर्ष 6 महिने काम केले असेल तर ग्रॅच्युएटीचे मोजमाप हे 6 वर्षांच्या आधारावर केली जाते.

अशी मिळते ग्रॅच्युएटीची माहिती –
कोणत्याही कर्मचाऱ्याच्या ग्रॅच्युएटीची रक्कम ही दोन गोष्टींवर अवलंबून असते. कर्मचाऱ्याने कंपनीत किती वर्ष काम केले आणि त्याची अंतिम पगार किती होती. या पगारात बेसिक पगार आणि महागाई भत्ता याचा समावेश असतो. यासाठी तुम्हाला कंपनीत काम केलेल्या वर्षांचा 15 दिवसांच्या पगाराशी गुणाकार करायचा आहे. 15 दिवसांचा पगार हा तुमच्या शेवटच्या पगाराच्या आधारावर असेल. ग्रॅच्युएटीचे मोजमाप करताना एका महिन्याची सर्विस ही 26 दिवसांची समजली जाते. 15 दिवसांचा पगार याच आधारावर मोजला जातो.

याचसाठी 15 दिवसांचा पगार काढण्यासाठी तुम्हाला शेवटच्या महिन्याच्या पगाराला 26 ने भाग द्यावा लागेल व त्यानंतर येणाऱ्या रक्कमेला 15 ने गुणाकार करावा लागेल.  त्यानंतर येणाऱ्या रक्कमेला तुम्ही किती वर्ष काम केले त्याच्याशी गुणाकार करा.

30 दिवसांच्या आत ग्रॅच्युएटी –
कंपनीला कर्मचाऱ्याच्या शेवटच्या दिवसापासून ते 10 दिवसांच्या आत ग्रॅच्युएटी देणे गरजेचे असते. जर ग्रॅच्युएटी देण्यास कंपनीला 30 दिवसांपेक्षा अधिक उशीर झाला तर कंपनीला त्यावर व्याज द्यावे लागते.