रितेश-जेनेलियाचा पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात


मागील काहीदिवसांपासून कोल्हापूर आणि सांगली शहरामध्ये पुराने चांगलेच थैमान घातल्यामुळे कोल्हापूर आणि सांगली शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच क्षेत्रातील अनेकांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केले आहेत. पूरग्रस्त भागांमध्ये सामान्य जनतेपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनी शक्य तेवढ्या मदतीचा हात पुढे केला आहे. पुराचे पाणी कोल्हापूर आणि सांगली शहरात ओसरण्यास सुरुवात झाली आहे.


पुरग्रस्तांना अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियाने देखील २५ लाखांची मदत केली आहे. त्या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २५ लाखांचा चेक सोपावला आहे. रितेश आणि जेनेलियाने केलेल्या मदतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: आपल्या ट्विट अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांनी २५ लाखांचे योगदान दिल्यामुळे मी त्यांचा आभारी असल्याचे म्हणत मुख्यमंत्र्यांनी दोघांचे आभार मानले आहेत.