भारतात आलेल्या या शानदार कारचा पहिला मालक आहे धोनी


भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची बाइक्स आणि कार्सबद्दल असलेले प्रेम सर्वांनाच माहिती आहे. धोनीच्या गँरेजमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त गाड्यांचे क्लेक्शन आहे. गाड्यांसाठी त्याने रांची येथील त्याच्या घरातच गँरेज बनवले आहे. आता धोनीच्या गँरेजची शोभा वाढवण्यासाठी आणखी एका गाडीची एंट्री होणार आहे. ही नवीन कार जीप ग्रांड चेरोकी आहे.


या नवीन गाडीचे फोटो धोनीची पत्नी साक्षीने इंस्टाग्रामवर शेअर केले. साक्षीने धोनीला टँग करत पोस्टमध्ये लिहिले की,  रेड बीस्ट तुझे घरात स्वागत आहे. माही तुझे खेळणे अखेर येथे आले आहे. खरचं मिस यू. ही भारतातील अशाप्रकारची पहिलीच कार आहे.

या कारची किंमत भारतात 80 ते 90 लाख सांगितली जात आहे. साक्षीने ज्या लाल रंगाच्या गाडीचे फोटो शेअर केले ती जीप कंपनी ग्रँड चेरोके एसयूवी आहे.

ग्रँड चेरोके एसयूवीमध्ये ट्रँकहॉक एक 6.2 लीटर सुपरचार्ज्ड V8 HEMI इंजिन असून जे  700 bhp पॉवर आणि 875 Nm टॉर्क देते. ही गाडी 3.6 सेंकदात 0 ते 100 किमीचा स्पीड पकडते. डिझाईनमध्ये देखील गाडी एकदम शानदार आहे. यामध्ये 20 इंच एलाय व्हिल्स देण्यात आले आहे. याचबरोबर कँबिनमध्ये 8.4 इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे.

महेंद्रसिंह धोनी सध्या काश्मीरमध्ये भारतीय सैन्याबरोबर ड्युटीवर आहे. धोनीने सैन्यामध्ये काम करण्यासाठी क्रिकेटपासून दोन महिने आराम घेतला आहे. धोनी पँरा कमांडोच्या बटालियनमध्ये 15 दिवसांसाठी कार्यरत आहे. त्यांच्याबरोबर गोरखा, शिख, राजपूत, जाट अशा सर्वच रेजिमेंटचे 700 सैनिक तैनात आहेत. येथे धोनी डे-नाइट दोन्हीची शिफ्ट करत आहे.

Leave a Comment