कार चोरी रोखण्यासाठी करा हे उपाय


सध्या गाड्या चोरी होणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. एक्सपर्टनुसार, अनेक लोक गाड्या अनोळखी ठिकाणी पार्क करतात, ज्यामुळे गाड्या चोरीला जातात. तसेच व्यवस्थित लॉक करत नाही त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात गाड्या चोरी होतात. तर अनेक गाड्यांमध्ये केवळ बेसिक सेफ्टी फिचर्स असताता, ज्यामुळे चोर सहज गाड्या पळवून नेतात. आज आम्ही तुम्हाला कार चोरी होण्यापासून वाचवण्यासाठी काय उपाय करता येतील ते सांगणार आहोत.

या कार्सवर चोरांचे सर्वाधिक लक्ष –
चोरांचे सर्वाधिक लक्ष हे मारुती सुजुकी ऑल्टो, स्विफ्ट डिजायर, ह्युंदाई आय 10, सेट्रो, टाटा टियागो, होंडा सिटी आणि महिंद्रा बोलेरो या कारवर असते. बाजारात या गाड्यांची चांगली किंमत मिळते. मात्र असे नाही की चोरांचे दुसऱ्या कारवर लक्ष नसते, चोर दुसऱ्या कार देखील सहज चोरू शकतात.

या रंगाच्या कारची होते सर्वाधिक चोरी –
आकडे सांगतात की, भारतात सर्वाधिक पांढऱ्या रंगाच्या कार चोरीला जातात. यामागील सर्वात मोठे कारण सांगितले जाते, ते म्हणजे की चोर पांढऱ्या रंगाच्या कारला लगेचच दुसऱ्या रंगात बदलू शकतात. दुसऱ्या रंगाच्या कारला वेगळ्या रंगात बदलणे सोपे नसते.

उपाय –
जर तुम्ही विचार करत असाल की, केवळ सेंट्रल लॉकिंग अथवा गेअर लॉक केल्याने कार सुरक्षित राहते तर ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. चोरांना या सारखे फिचर्स असणाऱ्या कार चोरी करणे सहज शक्य आहे. जर तुमच्या गाडीत आणखी सेफ्टी फिचर्स असतील तर चोरांना गाडी चोरणे अवघड जाते. चला तर मग जाणून घेऊया कार चोरी रोखण्यासाठी काय उपाय आहेत.

टायर लॉकरचा वापर करावा –
टायर लॉकर सर्वात चांगली व विश्वासार्ह्य एक्सेसिरीज आहे. याचा वापर कारच्या टायरसाठी केला जातो. यामुळे तुमची कार चोरी करण्याचा कोणी विचार देखील करणार नाही. हे एक मोठे लॉक असते, जे खूपच मजबूत असते व ते तोडायला आणि कापायला देखील खूप वेळ जातो. त्यामुळे चोर अशा गाड्या चोरण्याचा प्रयत्न करत नाहीत.

स्टेअरिंग व्हिल लॉक –
टायर लॉकप्रमाणेच स्टेअरिंग व्हिल लॉक देखील बाजारात उपलब्ध आहे. चोरांपासून वाचण्यासाठी हे एक जबरदस्त प्रोडक्ट आहे. स्टेअरिंग व्हिल लॉक गाडीचे स्टेअरिंग लॉक करते. यामुळे चोर तुमच्या गाडीला कुठेच घेऊन जाऊ शकत नाहीत. स्टेअरिंग व्हिल लॉक तोडणे कठीण असते.

जीपीएस ट्रँकर –
आपल्या कारमध्ये जीपीएस ट्रँकर नक्की लावा. तुम्ही ते अँपच्या मदतीने फोनमध्ये देखील  इंस्टॉल करू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या कारला ट्रँक करू शकता. जरी तुमची कार कोणी चोरी केली तरी देखील तुम्ही गाडीवर लक्ष ठेवू शकता. एवढेच नाही तर तुम्हाला त्याचे मोबाईलवर नॉटिफिकेशन देखील मिळेल.

किल स्विच –
या जबरदस्त टेक्नोलॉजीमध्ये वायर जोडलेली असते. याला कारच्या इंजिन आणि इग्निशनच्या मध्यभागी इंस्टॉल केले जाते. जोपर्यंत त्याला बंद केले जात नाही तोपर्यंत कारच्या आतील इलेक्ट्रिक फंक्शन बंद ठेवते. ज्यामुळे तुमची कार सुरू होत नाही. या टेक्नोलॉजीला ऑन किंवा ऑफ करण्याची पध्दत आणि जागा केवळ कारच्या मालकालाच माहिती असते.

इमोबिलाइज –
हे फिचर आता सर्वच कारमध्ये पाहायला मिळते. हे खुपच चांगले सिस्टिम आहे. यामध्ये कार केवळ आपल्याच चावीने सुरू होते. इमोबिलाइज एका चिपप्रमाणे काम करते. जर कोणी तुमच्या कारला दुसऱ्या चावीन सुरू करण्याचा प्रयत्न करत असेल तर कार सुरू होणार नाही.