पुरग्रस्त महिलांचे जवानांसोबत अनोखे रक्षाबंधन


पावसामुळे आलेल्या पुरात दक्षिण आणि पश्चिम भारतातील अनेक भाग उद्धवस्त झाले. आता पर्यंत या पुरामध्ये 183 लोकांनी आपला जीव गमावला आहे. एकट्या केरळमध्येच आतापर्यंत 72 लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 111 जणांनी आपला जीव गमावला आहे. या सर्व राज्यांमध्ये सैन्य, तटरक्षक, एनडीआरएफ, पोलिस, स्वयंसेवक, मच्छीमार लोकांना वाचवत आहेत.

या बचाव कार्यातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोणी जीव वाचवणाऱ्या जवानांच्या पाया पडत आहे तर कोणी त्यांना राख्या बांधत आहेत. तर अनेक जण त्यांना ओवाळत देखील आहे.

हा पहिला व्हिडीओ सांगली जिल्ह्यातील आहे. नावेमध्ये काही जवान महिलांना आणि मुलांना सुरक्षित स्थळी नेत आहेत. या नावेवर बसलेली महिला एवढी भावूक होते की, या जवानांच्या पाया पडते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुमचे देखील मन भरून येईल.


हा दुसरा व्हिडीओ देखील सांगलीचाच आहे. बचाव अभियानानंतर महिलांनी एनडीआरएफ फोर्स आणि सिक्युरिटी फोर्स यांची आरती केली. अनेक महिलांनी या जवानांच्या हातांवर राखी देखील बांधली.


महाराष्ट्रात मागील आठवड्यापासून कोल्हापूर, सांगली, सातारा, ठाणे, नाशिक, रत्नागिरी, पालघर या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक शहर पाण्याखाली गेली आहेत.

Leave a Comment