उघड्यावर दारू पिताना पोलिसांनी पकडल्यावर गुंडानी केले हे कृत्य


दक्षिण कोलकत्तामध्ये एका पोलिस स्टेशनमध्ये स्थानिक 20 ते 30 लोकांनी घुसत स्टेशनची तोडफोड केली असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 7 पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी उघड्यावर दारू पित असताना दोन जणांना अटक करण्यात आली होती त्यानंतर ही घटना घडली.

कोलकत्ता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, रविवारी रात्री सर्दन एवेन्युमध्ये राहणाऱ्या लोकांनी टॉलीगंज स्टेशनमध्ये काही अज्ञात युवक उघड्यावर दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची फोनद्वारे तक्रार दिली.

यानंतर दोन जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या परिवारातील काही सदस्य आरोपींना सोडण्याची मागणी करत स्टेशनमध्ये घुसले.

अधिकाऱ्याने सांगितले की, प्रकरण हताळण्याऐवजी, पोलिसांनी दोघांना सोडून दिले व चुकीच्या वागणूकीसाठी त्यांच्याविरूध्द तक्रार दाखल केली. मात्र ते दोघेही जण काही लोकांना घेऊन पुन्हा स्टेशनमध्ये परतले व तोडफोड करत पोलिसांवर त्यांनी हल्ला केला. यामध्ये 7 पोलिस कर्मचारी जखमी झाले.